Wednesday, 17 September 2025

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत 18 व 19 सप्टेंबर रोजी बांबू परिषद

 आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत

18 व 19 सप्टेंबर रोजी बांबू परिषद

 

मुंबईदि. 16 :- वातावरण बदलाचे संकट रोखून मानव जात वाचवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन" (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. 18 आणि 19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही परिषद होणार आहे.

"बांबू फॉर पीपलप्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्डग्रीन एनर्जीग्रीन अर्थ" अशी संकल्पना घेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष  पाशा पटेल यांनी या परिषदेबाबत माहिती देताना सांगितले.

पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi