मंत्र्यांकडून महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन
प्रत्येक स्टॉलला भेट देत मंत्री श्री. गोरे यांनी उत्पादनांची माहिती घेतली आणि महिलांना विक्री व ब्रँडिंगसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असून, शासनाची भविष्यातही अशीच साथ राहणार आहे.”
या भेटीदरम्यान ‘उमेद’च्या लाडक्या बहिणींनी मंत्री श्री.गोरे यांना राखी बांधली. या वेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, अवर सचिव धनवंत माळी, तसेच इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment