Monday, 4 August 2025

हर घर तिरंगा 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम pl share

 दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम हर घर तिरंगा राबविण्यात येणार आहेतअसे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले कीतिरंगा मेळाव्याचे आयोजन राज्यात होणाऱ्या सरस महोत्सवासारखे करण्यात येणार आहे. यात तिरंगाचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्वांना सहज आणि सुलभरित्या तिरंगा उपलब्ध व्हावायासाठी महिला बचत गटाकडे तिरंगा निर्मिती व विक्रीचे काम देण्यात यावे. जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर या कालावधीत प्रत्येकांच्या हातात तिरंगा देऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेत राज्यातील प्रत्येक विद्यार्थीतरूण-तरूणी आणि नागरिक यांचा सहभाग वाढवून मनुष्यसाखळी तयार करावी तसेच मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर गीते आणि राष्ट्रगीते लावण्यात यावीअसेही डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi