Monday, 4 August 2025

राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात, पहिला टप्पा

 राज्यात हर घर तिरंगा’ अभियानाची  सुरूवात

सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी

मुंबईदि. 1 : देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावेराज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावेया उद्देशाने 2 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात यावेअशा सूचना सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिल्या.

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. यासंदर्भात सचिव डॉ.कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊतउपसचिव महेश वाव्हळसांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरेराज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ तसेच दृरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात मागील तीन वर्षापासून हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले कीपहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविला जाईल. दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट 2025 तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावीयासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणेशाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणेतिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणेरांगोळी स्पर्धा आयोजित करणेमाय गर्व्हमेंट या संकेतस्थळावर प्रश्नमंजूषेत सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणेतिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवानपोलीसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घरआजुबाजूचा परिसरसार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणेतिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi