Sunday, 6 July 2025

संताचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून

 संताचा संदेश प्रत्य








क्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 'निर्मलदिंडी', 'चरणसेवाआणि 'आरोग्यवारीउपक्रमाचा समारोप

 

पंढरपूरदि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहेआपल्या नद्यांवरनिसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येतांना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतातअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 'निर्मलदिंडीतसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या 'चरणसेवाउपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारीउपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेपणन मंत्री जयकुमार रावलकृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेगृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरखासदार धैर्यशील मोहिते-पाटीलआमदार समाधान आवताडेअभिजित पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कलशेट्टीडॉ.बाबासाहेब देशमुखदेवेंद्र कोठेविक्रम पाचपुतेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमराज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेलाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केलात्यामुळे पालखीतळावर स्वच्छता राखली जाते. आपली वारी निर्मलस्वच्छ झाली आहे.

 ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने  निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविलीत्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत स्वच्छतेचा लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतातत्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा   केल्याचा प्रत्यंतर यावाया सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.

            वारीच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारीउपक्रमाच्यामाध्यातून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याकरिता आवश्यता त्या सुविधा उपलब्ध करुन अतिशय सुंदर नियोजन केले. पुणेसातारा आणि सोलापूर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल तसेच निर्मल दिंडीचरणसेवाआरोग्यवारी यशस्वी केल्याबद्दल प्रशासनसेवाभावी संस्था आदींचे त्यांनी अभिनंदन केले. 

वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेवून वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्थामहिलांकरिता स्वच्छतागृहासह, स्नानगृहअशा आवश्यक सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केलायावर्षी नवीन उंची गाठत एक बेंचमार्क निर्माण केला आहे.त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पाहयाला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसतेसेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजेअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi