Friday, 13 June 2025

अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त

 अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

तीव्र शोकसंवेदना व्यक्त

महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागीमदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश

 

मुंबईदि. १२ :- अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावकवेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्वमहाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळोअशी ईश्वचरणी प्रार्थना करतोअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतातअहमदाबाद-लंडन या विमानाची झेप ही अनेकांसाठी अंतिम ठरली. रहिवासी परिसरात हा अपघात झाल्याने या अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताने देश दुःखात बुडला असूनविमानातील प्रवाशीविमानातील अधिकारी-कर्मचारीअपघातग्रस्त परिसरातील नागरिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊनतातडीने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे.

या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिकआमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासहप्रवासी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे. अपघातातील जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी तसेच संबंधितांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधांसाठीवैद्यकीय उपचार आणि अनुषंगिक उपाययोजनांबाबत सज्जता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेतअसेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi