एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित
मुंबई, दि. १२ : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे
या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे
No comments:
Post a Comment