Thursday, 22 May 2025

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 'एसओपी' ची अंमलबजावणी करावी ,pl share

 जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 'एसओपीची अंमलबजावणी करावी

                                        - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 22 : जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) अवलंब केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या तसेच महसूलआरोग्य व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीजन्म प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) महसूल विभागाने वापर करावा. यापूर्वी देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र शासनाने रद्द केले असून ते परत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्यनगर विकासमहसूल व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

          रद्द करण्यात आलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करण्यासाठी कार्यवाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. तसेच यासंदर्भातील आढावा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्येक 15 दिवसांनी घेतील असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi