Friday, 23 May 2025

बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यांत गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या

 निवडणूकीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहिला बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यांत गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हेत्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणेनिहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करावीअसे त्यांनी सूचित केले.

दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे. गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावेअसे सूचित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. 60 ते 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे. आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावेअसे ते म्हणाले.

दरम्यानकायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी 117 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूरमधील 2019 च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात. लोकांमध्ये जनजागृती करावीअसे त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा प्रशासनजिल्हा परिषदमहानगरपालिका आणि पोलीस दल या चारही प्रमुख यंत्रणा सतर्क राहून परस्पर समन्वयाने संभाव्य महापूर परिस्थितीत कामगिरी पार पाडतीलअशी ग्वाही दिली.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामगिरीविषयक सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणीपोलीस दलाची रचनामालमत्ताविषयक व इतर दाखल उघड गुन्हेगंभीर गुन्हेमहिलांविषयक गुन्हेअवैध धंदे कारवाईप्रतिबंधक कारवाईगुन्हे निर्गतीसमन्स वॉरंटगुन्हे दोषसिद्धी प्रमाणखटले निर्दोष सुटण्यामागची कारणेनवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणीनवीन कायदा प्रशिक्षणई साक्ष ॲपफॉरेन्सिक व्हॅनभारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल दोषारोपपत्रझिरो एफआयआर नोंदणीई समन्समालमत्ताविषयक गुन्ह्यातील हस्तगत मालमोटार वाहन कायद्याखालील केसेसअमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सअमली पदार्थ विशेष कारवाईसात कलमी कृती आराखड्यांतर्गत कार्यवाहीनाविन्यपूर्ण उपक्रमविशेष कामगिरीपोलीस दलाचे कल्याणकारी उपक्रमजिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेले उपक्रम आणि आव्हानांची माहिती सादर केली.

कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारीपोलीस निरीक्षकसहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi