Sunday, 13 April 2025

आपले सरकार' पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

 आपले सरकारपोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

 

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील.

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळेनागरिकांनीआपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनीग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावेअसे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभागमहाराष्ट्र शासन यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi