महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी : मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली. राज्यातील स्टार्टअप्सला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रयत्नशील आहेत. जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप्स देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप्स : फाल्गुनी नायर
‘नायका’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे.महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा, असेही सांगितले.
यावेळी डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप्स विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक, व्यवस्थापक अमित कोठावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अवाना दुबाश, राखी तांबट यांनी केले.
000
No comments:
Post a Comment