Thursday, 16 January 2025

आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

 आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचे

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबई, दि. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठलोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी, २०२५ दरम्यान पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करून १३ सुवर्ण७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजेत्यांचे आणि मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होण्यासही मदत होईल.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरेकुलसचिव डॉ. प्रसाद कारंडेडॉ. सुनिल पाटील,डॉ. मनीष देशमुख ,डॉ. वैशाली निरमळकरप्रा. डॉ. शशिकुमार मेननप्रा. डॉ. सुनीता शैलजनडॉ. मिनाक्षी गुरवडॉ. भूषण लांगीडॉ. रूपा राव मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राजभवन येथे आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये  राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठतून या स्पर्धेसाठी मानव्यविद्याभाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी,  मुलभूत शास्त्रे,  शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली आहेत.

या स्पर्धेत प्रथम बंडाबेझनेटा रेमंडराधिका भार्गवश्रेयांस कांबळेचैताली बनेकृष्णकांत लसुनेफरहीन शेखविवेक शुक्लाअंकित गोहिलश्रावणी वाडेकरतनिशा कौरप्रतिक मेहेरआणि वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक अथर्व लखानेचैत्रा देशपांडेमंगलम लुनकरऋतुजा शिंदेविरा जैनआभाश शर्मा आणि मानसी झा यांना प्रदान करण्यात आले. समृद्धी मोटेतेजश्री जायभाये आणि श्रेया गर्गे यांना कांस्य पदक मिळाले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi