Saturday, 14 December 2024

⚜️⚜️⚜️⚜️⚜️ *श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सवाची*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

     *श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सवाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


           *🔱श्रीक्षेत्र माहुर🔱*


⚜🌹⚜🌹🙏🌹⚜🌹⚜

 

        *कलियुगी तारक ।*

        *स्वामी दत्तराज एक ॥*

        *त्याचें नाम नित्य गावें ।*

        *भवसिंधुसि तरावें ॥*

        *दत्तमूर्ति हृदयीं ध्यातां ।* 

        *पावे मोक्ष सायुज्यता ॥*

        *दत्त वसे जया मनीं ।*

        *तया दत्त जनीं वनीं ॥*

        *एका जनार्दनीं दत्त ।*

        *सबाह्म स्वानंदभरित ॥* 


        *श्रीक्षेत्र माहुर. श्री दत्तगुरुंचे हे जन्म स्थान आणि विश्रांती स्थान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक परमेश्वर अवताराचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे.. वैशिष्ट्य आहे. रज.. सत्व.. तम हे तिन्ही गुण गरजेचेच, पण यापैकी कोणत्याही गुणाचा अतिरेक नको.. तारतम्य हवे.. अहंकार तर अजिबात नको हे शिकवणारा हा श्री गुरुदेव दत्त अवतार.*

        *श्री दत्तगुरुंनी एकात्मता शिकवली. वैष्णव.. शैव.. शाक्त, महानुभवीपंथीय, नाथ, अवधूत परिवार, दत्त संप्रदायी.. समर्थ रामदास स्वामी संप्रदाय या सर्वांचेच श्री दत्त हे गुरु. त्यांनी सगळ्यांना जोडले. सर्व जाती.. पंथ.. धर्म यांनाही एकत्र केले. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे. या नाथ संप्रदायाचे नवनाथ असो वा ८४ सिद्ध हे सारे श्री दत्तगुरुंना योग गुरु मानतात. हा नाथ संप्रदाय विदेशातही आहे. कलियुगात या गुरुंचे महत्त्व सर्वाधिक आहे.*              

        *सर्वाना एकत्र करणारा श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक असला तरीही त्यांना मूर्तीपेक्षाही पादुकांचे जास्त महत्त्व आहे. ईश्वरी मूळ रुप हे निर्गुण निराकार आहे. विविध दत्त तीर्थ क्षेत्री श्री दत्ताचे पूजन अशा पादुकांच्या रुपांत दत्त भक्त करतात. पादुका कुठे चल तर कुठे अचल आहेत. श्रीदत्त पादुका-गिरनार, श्री विमल पादुका-औंदुंबर, श्री मनोहर पादुका-नृसिंहवाडी, श्री निर्गुण पादुका-कारंजा, गाणगापूर, लातुरला, श्रीपाद श्रीवल्लभ पादुका-पीठापूर आणि कुरवपूर, श्री करुणा पादुका-कडगंची, श्रीस्वामी समर्थ पादुका-अक्कलकोट, श्रीशेषदत्त पादुका-बसवकल्याण, अवधूत पादुका-बाळेकुंद्री, प्रसाद पादुका-वासुदेव निवास पुणे तसेच श्री माणिकप्रभू.. श्री टेंब्ये स्वामी, श्री शंकर महाराज इ. स्थळी सर्वच दत्त मंदिरात पादुकांचे भावभक्तीने दर्शन घेत पूजन केले जाते.*

        *श्री दत्तगुरुंचा श्री गुरुचरित्र पारायण सोहळा म्हणजे सातदिवस भक्तीचा जागर. आजचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे भक्ती आनंदाचा परमोच्च क्षण.*

        *निष्पाप.. पापभीरु अशा लहान गोंडस बालकामध्ये परमेश्वरच वास करतो. बाललीला अनुभवणे हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा आनंद. जेव्हा रज.. सत्व.. तम गुणांचे अधिकारी ब्रह्मा.. विष्णू.. महेश हे बालक म्हणून अत्री ऋषींच्या पर्णकुटीत प्रकटले तेव्हाचा ब्रह्मानंद काय वर्णावा.. राजमहालापेक्षा ही पर्णकुटी भाग्यवान ठरली.*

        *सत्वगुणांचाही कुणाला हेवा.. मत्सर वाटतो. त्यामुळे अहंकार दुखावतो हे बघून धडा शिकवायला दत्तगुरुंना प्रगट व्हावे लागले हे निमित्त. पण कलियुगातील मानवाला भक्तीची दिशा देण्यासाठी हा अवतार. आज देशभर याचे प्रत्यंतर येत आहे. करोडो भक्त या सप्ताह काळात भक्तीत रममाण होत आत्यंतिक आनंद.. उर्जा.. चैतन्य अनुभवत आहेत.*

        *जेव्हा प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश हे सृष्टीकर्ते.. चालक चक्क बालरुपात अत्री ऋषींच्या आश्रमात रांगत होते, तिघांनाही अनसूया माता घास भरवत होती हे दृश्य बघणारे ऋषीगण भाग्यवानच.* 

        *या त्रिमूर्तीच्या बाललीलांनी अत्री ऋषींच्या आश्रमात चैतन्य निर्माण झाले होते. आज पुन्हा तेच दृश्य घरोघरी.. मंदिरात अनुभवले जाणार. चराचरही या जन्मोत्सवाने हर्षभरीत होणार.*   

        *श्री दत्ताचे सुंदर रुप बघताच अंतरंगात भक्तीभाव उचंबळतो. सोबतचे चारही श्वान जे वेदांचे प्रतीक आहेत, ते सुद्धा कृतज्ञतेने नतमस्तक झाले आहेत. तर जगन्माता गाय ही कौतुकाने त्यांना बघतेय.*

        *दत्तगुरुंची शुंभकर पाऊले या घराला लागताच घराचे मंदिर झालेय. आनंदाला पारावर नाही. हे हृदयपाखरु स्वानंदात घरभर फिरले. ही सारी देवा तुमचीच किमया आहे. सभोवती तुम्हीच विहारासाठी आनंद तरंग निर्माण केलेत.*          

        *श्री गुरुदेव दत्तांचा कृपा आशीर्वाद आपणास लाभो.*   

           

🌸🛕🚩🔱🙏🔱🚩🛕🌸

  1️⃣

  *ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर*

  *सामोरी बसले*

  *मला हे दत्तगुरू दिसले*


  *माय उभी ही गाय हो‍उनी,*

  *पुढे वासरू पाहे वळुनी*

  *कृतज्ञतेचे श्वान बिचारे*

  *पायावर झुकले*


  *चरण शुभंकर फिरता तुमचे,* 

  *मंदिर बनले उभ्या घराचे*

  *घुमटामधुनी हृदयपाखरू*

  *स्वानंदे फिरले*


  *तुम्हीच केली सारी किमया,* 

  *कृतार्थ झाली माझी काया*

  *तुमच्या हाती माझ्या भवती*

  *औदुंबर वसले*


  *गीत : जगदीश खेबुडकर*  ✍

  *संगीत : सुधीर फडके*

  *स्वर : आशा भोसले*

  *चित्रपट : आम्ही जातो आमुच्या गावा (१९६८)*


🌹⚜️🌸🔆🚩🔆🌸⚜️🌹

  2️⃣

            *गुरु ब्रह्मा गुरु विष्णु*

            *गुरु देवो महेश्वरः*

            *गुरु साक्षात परब्रह्म*

            *तस्मै श्री गुरवे नमः*


  *अनुसया अत्री सुकुमारा ।*

  *दत्त दयाघन दयावरा ॥*

  *पद्म कमंडलू गधा धरा ।*

  *त्रिशूल हे शोभे करा ॥*

  *षढवीत आयुढ परी करा ।*

  *पूर्णानंदा अवतारा ॥*

  *सुभस्मा रुद्राक्षा भरणा ।*

  *भव भय दु:ख निवारणा ॥*

  *काश्यायांबर वसन धरा ।*

  *श्री मेघ श्याम सुंदरा ॥*

  *अवधूता हे गिरीवरा ।* 

  *ओझे तेजो द्वीतीधरा ॥*

  *षडभूज मूर्ती वीरा जीता ।* 

  *विश्वरूप हे विश्वंभरा ॥*

  *भक्त प्रिय वज्रपंजरा ।* 

  *दिनांचा उद्धार करा ॥*

  *दत्तात्रेय अवतारा ।* 

  *श्रीपाद नरसिंहवरा ॥*

  *नित्य निरंजन ओमकारा ।* 

  *कलयुगी ऐशी आकारा ॥*

  *जन्म घेशी तु पिठापुरा ।*

  *सचित धन तु शुभम करा ॥*

  *शाश्वत पावन तपोवरा ।* 

  *शब्द दाविसी ओमकारा ॥*

  *कृष्ण संगमी दरूवरा ।* 

  *नित्य वसे औदुंबरा ॥*

  *विप्ररूप वैराग्य वरा ।* 

  *प्रियजन हे परमेश्वरा ॥*

  *हे मुनिजन मानसचंद्रा ।*

  *तु गुरु धैर्य समुद्रा*

  *जगधीशा जगत उद्धारा ।*

  *उद्धरी मज गुरुवरा ॥*

  *करुणानिधी करुणाकारा ।*

  *निर्गुण हे निर्विकारा ॥*

  *गुरुराया कल्याण करा ।* 

  *निजा नंदी द्रुड करा ॥*

  *चिन्मय चीतघन चिदंबरा ।* 

  *अंतर योगी अगोचरा ॥*

  *ब्रम्हा विष्णू महेश्वरा ।*   

  *स्वामी समर्था कृपा करा ॥*


            *दिगंबरा दिगंबरा* 

            *श्रीपाद वल्लभ दिगंबरा*


  *रचना : पारंपारिक दत्तात्रेय धून*

  *स्वर : सागर लेले*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧

  

  *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१४.१२.२०२४-*


🌻🍃🥀🔆🌸🔆🥀🍃🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi