Wednesday, 23 October 2024

संगीतभूषण पं. राम मराठे* *जन्मदिनाची* ⚜️⚜️💐⚜️⚜️

 🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        *संगीतभूषण पं. राम मराठे*

                  *जन्मदिनाची*

            ⚜️⚜️💐⚜️⚜️

                                                      

🌸🥀🔆🌺💯🌺🔆🥀🌸

       

         *आपल्या मुलाचे सुप्तगुण वडिलांनी ओळखले. त्याची गायनाची आणि अभिनयाची आवड, क्षमता हेरुन कलागुणाला प्रोत्साहन दिले. मुलानेही त्याचे चिज केले. संगीतभूषण ठरले. कुणी रागांचा बादशहा म्हणून गौरविले.*   

        *श्री रामचंद्र पुरुषोत्तम मराठे अर्थात पं. राम मराठे. जन्म पुणे (१९२४-१९८९). हे चित्रपट.. नाट्य.. संगीत क्षेत्रातील गायक.. नट.. अभिनेते असे चतुरस्त्र व्यक्तीमत्व. त्यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.*

        *हिन्दी मराठी चित्रपटात बालकलावंत म्हणून नावलौकिक प्राप्त केला. मनमोहन, जहागीरदार, वतन (हिन्दी) सह १६ चित्रपटात भूमिका केल्या. व्ही. शांताराम यांच्या 'गोपालकृष्ण' मध्ये कृष्णाची मध्यवर्ती भूमिका केली. तर प्रभातच्याच 'माणूस' (आदमी-हिंदी) मध्येही भूमिका केली. पूढे अभिनेते म्हणून यशस्वी होणे सहज शक्य होते. पण शास्त्रीय संगीताकडे त्यांचा ओढा होता. त्यांनी अनेक गुरुंकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.* 

        *त्यांनी सगळ्या संगीत घराण्यातील उत्तम ते आत्मसात करुन शास्त्रीय गायक म्हणून ओळख निर्माण केली. देशभरातील संगीत महोत्सवात त्यांच्या गायकीला दाद मिळाली. ख्याल गायक म्हणून विशेष ओळख मिळाली. त्यांचे वैशिष्ट म्हणजे वेगवेगळ्या दिग्गज गायकांची गाणी ते मैफिलीत त्यांच्या लकबीसह एवढे हुबेहूब गायचे की श्रोत्यांना मूळ गायकच ऐकतोय असे वाटायचे. यामध्ये पं. राम मराठेंचा अभिनयही दिसायचा.*

        *त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गळ्याची उत्तम फिरत, खुला दमदार आवाज, तानेतील स्पष्टता, दाणेदारपणा व समेवर हमखास येण्याचे कौशल्य होते. त्यांना शेकडो बंदिशी अवगत होत्या. गणपतराव बोडस यांनी त्यांना संगीत रंगभूमीवर आणले. बालगंधर्वा सह दिग्गज गायकासह भूमिका करताना ठसा उमटवला. त्यांनी 'मदनाची मंजिरी', 'संगीत मंदार-माला', 'मेघमल्हार' इ. नाटकाला संगीतही दिले.. अभिनयही केला.*

        *आकाशवाणी तसेच अनेक विद्यापीठाच्या मंडळावर कार्य केले. संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पं. राम मराठे यांच्या गायनात अनेक गायक भेटल्याचा आनंद श्रोत्यांना व्हायचा.. ते संतृप्त व्हायचे. त्यांनी पं. उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल सारखे अनेक शिष्य घडविले. त्यांचा वारसा मुले, मुली, नातवंडे चालवत आहेत. त्यांच्या ध्वनीमुद्रिका म्हणजे संगीत क्षेत्राचा मोठा ठेवा आहे.*

        *हिन्दुस्थानी संगीत समृद्ध करणाऱ्या या चतुरस्त्र व्यक्तीमत्व पं. राम मराठे यांना जन्मशताब्दी वर्षात विनम्र अभिवादन.*


🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹


  *जयोस्तुते हे उषादेवते*

  *देवि दयावति महन्मंगले*


  *रुचिर-यौवना रूप-सुंदरा*

  *जगन्मोहिनी अरुण-रंजिते*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹


  *गीत : विद्याधर गोखले*  ✍️

  *संगीत : पं. राम मराठे*

  *स्वर : पं. राम मराठे*

  *नाटक : मंदार-माला*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-२३.१०.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi