Thursday, 10 August 2023

आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात

 आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात

विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

 

            मुंबई, दि. 9  : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने विधानभवनाचा परिसर दुमदुमून गेला. दिंडोरीपेठसुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पारंपरिक नृत्यांवर ठेका धरला आणि गायनात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.

            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमाजी आमदार राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडाक्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले.

            उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपरिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi