Thursday, 10 August 2023

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाससलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

 सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाससलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

 

            मुंबईदि. 9 : नावीन्यपूर्ण संकल्पनाविविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणीभेटायला येणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचे निरसन व्हावेयासाठीची सुयोग्य यंत्रणा आणि कार्यपद्धती यांस अनुसरून राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय काम करीत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा होऊन काम करणारे अर्थात मंत्री कार्यालय सलग दुसऱ्यांदा आयएसओ प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहे. मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश’ अभियानाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारआयएसओचे अधिकारी व्ही. बालकृष्णन यांच्या हस्ते मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

            गेल्या पाच वर्षांत मंत्री म्हणून श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला मिळालेला हा दुसरा बहुमान आहे. मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावेत्यांना विनाकारण ये-जा करावी लागू नयेयासाठी त्यांच्या तक्रारींचीनिवेदनाची दखल घेत त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती या कार्यालयात अवलंबली जात आहे. मंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ते अगदी लिपिकापर्यंत कामाची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याबाबत स्वत: मंत्री श्री. मुनगंटीवार सातत्याने आग्रही असतात आणि त्यासंदर्भात पाठपुरावाही करतात. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल आयएसओ प्रमाणपत्राद्वारे सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आहे.

            या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री अतुल सावेमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi