Monday, 31 July 2023

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

 आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. ३१ : आपत्ती व्यवस्थापन ही आज काळाची गरज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शासनस्तरावर कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी याविषयी माहिती दिली आहे.


            आपत्कालिन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आहे. यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आपत्ती पीडितांना आपत्तीमधून सोडविण्यासाठी, मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन - प्रशासन यंत्रणेच्या जोडीने आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान आणि आपत्ती पश्चात कोणकोणती कामे करावीत याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. आपत्कालिन परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य शासन आणि जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा कशा प्रकारे काम करीत आहे याबाबतची सविस्तर माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. धुळाज यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि.2 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi