Monday, 31 July 2023

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 

            मुंबईदि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानितविना अनुदानितकायम विना अनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत  सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

            या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            या अनुदान योजनेसाठी इच्छूक शाळांकडून दि. ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या शाळांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७० टक्के व अपंग शाळामध्ये ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे.

            स्वयंअर्थसहाय्यित शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीतअसे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi