Saturday, 18 February 2023

डॉ. लक्ष्मण आसबे यांचे रविवारी व्याख्यान

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत

डॉ. लक्ष्मण आसबे यांचे रविवारी व्याख्यान


            मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान रविवार, दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


            शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.


००००l

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत


डॉ. लक्ष्मण आसबे यांचे उद्या व्याख्यान.

            मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यांनी आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.


0



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi