Saturday, 18 February 2023

कधी काळी सायकल चालविण्यासाठी सुध्दा परवाना बिल्ले किंवा टोकन असायचे.. 🙏


 कधी काळी सायकल चालविण्यासाठी सुध्दा परवाना बिल्ले किंवा टोकन असायचे.. 🙏 


हो , एक काळ होता ज्या वेळेस सायकलीना खूप महत्त्व होते.सायकलची संख्या जास्त असल्यामुळे सायकलसाठी लायसेन्स म्हणजे परवाना (कर) ही संकल्पना पुढे आली.


नगरपरिषद , महानगरपालिका यांच्या मार्फत हा पितळी , अल्युमिनियम किंवा लोखंडी धातुत हे बिल्ले म्हणजेच परवाना दिले जात ज्यावर त्यावर नगरपरिषद किंवा नगरपालिकेचे नाव, सायकल टोकन क्र. व सण कोरलेला असत.


सायकलीच्या हँडल च्या पुढील बाजूस हा "बिल्ला"( परवाना) लावला जात, परंतु या बिल्ल्याची चोरी होत असल्याकारणाने अनेक जण सायकलच्या पुढील चाकाच्या स्पोकमध्ये किंवा सीटच्या खालील बाजूस आत मध्ये हा बिल्ला लावत.


सायकलीला दिवा नसणे, ट्रिपल सीट सायकल चालवणे या कारणावरून पोलीस हा परवाना तपासून पाहत.जर हा परवाना( बिल्ला) नसल्यास २ ते ५ पैशांचा दंड आकारला जात असे.


कालांतराने सायकली कमी झाल्या. आणि हे परवाने मागे पडले. 


छायाचित्रात पुणे, दिल्ली, जळगाव , छिंदवाडा (मध्य प्रदेश), तोशाम (पंजाब) या प्रदेशातील बिल्ले म्हणजेच परवाने दिसत आहेत..🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi