( मागील पानावरून)तर या प्रश्नाचे उत्तर मतदान का करायचे नाही, यातच सामावले आहे. सैनिक ज्याप्रमाणे देशाचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य समजतो, त्याप्रमाणेच प्रत्येकाने मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे. चांगले प्रतिनिधी संसदेत/विधानसभेत पाठविण्यासाठी, पुढील पिढीसाठी लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी, बळकट लोकशाही हवी असेल तर मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तरुण वाहन परवाना काढण्यासाठी सजग असतो त्याप्रमाणेच त्याने मतदार यादीत नाव येण्यासाठीही सजग असले पाहिजे.
ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध - अर्चना कदम
श्रीमती कदम म्हणाल्या की, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय वापरता येतात. घरबसल्याही ऑनलाईनद्वारे अर्ज करता येतो व त्या अर्जावरील कार्यवाहीची माहितीही मिळते. एनव्हीएसपी वेबसाईट, व्होटर पोर्टल, पीडब्ल्यूडी ॲप या विविध माध्यमातून अर्ज करता येते. ज्यांच्याकडे राहण्याचा पत्ता नाही, अशा बेघर, आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांना स्वयंघोषणापत्र देऊनही नोंदणीसाठी अर्ज करता येतो. तसेच मतदारसंघाबाहेर कर्तव्यावर असणारे, दिव्यांग, मतदान केंद्रावर जाऊ न शकणारे 80 वर्षावरील चालू न शकणारे ज्येष्ठ नागरिक यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो.
श्री. चांडक व श्रीमती घोलप यांनी मतदान नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच अर्ज नाकारण्याची कारणे आदींची माहिती दिली. सहायक मतदार नोंदणी अधिकारी वृषाली पाटील यांनी आभार व्यक्त केले. मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या 'निवडणूक समजून घेताना' ही पुस्तिका मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती नाईक यांना यावेळी भेट दिली.
जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला मतदार यादीत नाव नोंदविण्याचा संकल्प
परिसंवादादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे व मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक नेमाणे यालाही मित्र, नातेवाईक यांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. शिनगारे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःचे नाव नोंदणी करून मित्र, सहकारी, नातवाईकांनाही मतदार नोंदणी करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनीही परिसंवादसत भाग घेऊन मतदार नोंदणी प्रक्रिया समजून घेतली.
No comments:
Post a Comment