महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्नांसंबंधी संयुक्त बैठक आयोजित करू - केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांना आश्वासन
कोल्हापूर ः महाराष्ट्रातील रेल्वेसंबंधी विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांसंबंधी आगामी अधिवेशन काळात दिल्ली येथे संयुक्त बैठक आयोजित करू असे आश्वासन रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री नाम. दर्शना जरदोश यांनी ललित गांधी यांना दिले.
रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री नाम. दर्शना जरदोश दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौर्यावर आल्या असता इचलकरंजी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाम. दर्शना जरदोश यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन सादर केले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
ललित गांधी यांनी राज्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांची मांडणी करताना विविध मेट्रो प्रकल्पांचे क्रियान्वयन, माल वाहतुकीसंबंधी सेवा विस्तार, कोकण विभागातुन पार्सल सेवा सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष सुरूवात यांसह कोल्हापूर-अहमदाबाद सेवा दररोज सुरू करणे व गाडीचा मार्ग आबु रोड पर्यंत विस्तारीत करणे. कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करणे, पुण्याहुन गुजरातकडे जाणार्या गाड्या कोल्हापूरहुन रवाना कराव्यात.
कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणुन विकसित करावीत.
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सुरू करणे या प्रमुख मागण्या मांडल्या.
महाराष्ट्र चेंबरच्या रेल्वे विषयक समिती ने तयार केलेला सेवा विस्तार अहवाल ही यावेळी त्यांनी मंत्री महोदया यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग काऊन्सील सदस्य आम. प्रकाश आवाडे, नितिन धुत, अरूण ललवाणी, खास. संजयकाका पाटील, राहुल आवाडे, सतिश कोष्टी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment