कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची देय आणि प्रशिक्षण घेणाऱ्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन लवकरच देणार
- विश्वजीत कदम
मुंबई, दि. 24 : बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)मार्फत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी संलग्न असणाऱ्या विविध नामांकित संस्थेमार्फत राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची देय आणि
दि. 31 मार्च 2022 पर्यंत कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दिली जातील अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज विधान परिषदेत दिली.
याबाबत विधान परिषद सदस्य भाई ऊर्फ विजय गिरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यामध्ये सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, विनायक मेटे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांना (एनएसडीसी) ने निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार प्रशिक्षण शुल्क दिले जाते. आणि विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून राज्यावर आलेले कोविड चे संकट पहाता आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि अधिकचा निधी आरोग्यासाठी खर्च झाला त्यामुळे ही देय प्रलंबित राहिली होती. ती लवकरच देण्यात येथील.
0000
No comments:
Post a Comment