Friday, 12 November 2021

 निम्न पैनगंगा धरणापर्यंत 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी;

यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यांना होणार लाभ

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

·       मराठवाड्याच्या दृष्टीने ठरणार दिलासादायक निर्णय

 

            मुंबई दि. 12 : निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईलअसेही त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टिने दिलासादायक ठरणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले कीगोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहेअसे गृहीत धरून आंध्रप्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.

            अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत  समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.

            या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोलीयवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूसअरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहेअसे त्यांनी सांगितले.

            या निर्णयाने हिंगोलीयवतमाळनांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात जलसंपदा विभागामार्फत केल्या जातीलअसेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

००००


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi