Thursday, 21 October 2021

Perfect solution

 दशरथाने कैकेयी ला स्पष्ट पणे नकार देत सांगितले असते की मी  रामाला वनवासात कधीही पाठवणार नाही. तू दुसरा काही तरी वर माग. जास्त हट्टीपणा केलास तर लक्षात असू दे की मला अजून दोन बायका आहेत. तुझ्या मुळे काही अडणार नाही. तर रामायण कदापिही घडले नसते .......


रामाने देखील सीतेला स्पष्ट पणे  नकार देत सांगितले असते की मी काही हरिणाच्या मागे जाणार नाही. बाहेर ऊन खूप आहे आणि आज रविवार आहे. आराम करायचा दिवस. आणि जंगलात कशाला हवे तुला तेच हरीण. मला काही हे जमणार नाही ..!! तरी देखील रामायण घडले नसते.


तात्पर्य : बायकोला वेळीच नकार द्यायला शिका. ज्या दिवशी हे जमेल त्या दिवशी खरी विजयादशमी साजरी करता येईल. पण दशरथ आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना जे जमले नाही ते आपल्याला कसे काय शक्य होणार हाच खरा मोठा प्रश्न आहे .

असो .....!!!!!!आलीया भोगाशी.  😀😃😃

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi