मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एका वर्षात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
---
नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता
मुंबई, दि. 21 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने यास १७ तारखेला मान्यता दिली असून यावर्षी एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे महाविद्यालय सुरू होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, श्री.अरूण दुधवडकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
00000
सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम, 2021 बाबत
45 दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन
मुंबई, दि. 21 : केंद्र शासनाने 29 कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन 4 कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास 40 वर्षांनी होत आहे.
1. वेतन संहिता (एकूण 4 अधिनियम)
2. औद्योगिक संबंध संहिता (एकूण 5 अधिनियम)
3. सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण 9 अधिनियम)
4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणिर कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण 13 अधिनियम)
केंद्र शासनाने 29 सप्टेंबर 2020 रोजी पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता अधिनियम, 2020 च्या कलम 156 (2) अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सामाजिक सुरक्षा संहिता नियम, 2020, 13 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने, राज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा संहितेच्या अुनसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता नियम, 2020 च्या कलम 156(2) अनुसार राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात (www.dgps.maharashtra.gov.in) आणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटना, कामगार वर्ग, मालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम, 2021 बाबत सूचना आणि हरकती कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, ब्रांदा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.
००००
वेतन संहिता मसुदा नियम, 2021 बाबत
45 दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन
मुंबई, दि. 21 : केंद्र शासनाने 29 कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन 4 कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास 40 वर्षांनी होत आहे.
1. वेतन संहिता (एकूण 4 अधिनियम)
2. औद्योगिक संबंध संहिता (एकूण 5 अधिनियम)
3. सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण 9 अधिनियम)
4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण 13 अधिनियम)
केंद्र शासनाने 8 ऑगस्ट 2020 रोजी पारित केलेल्या वेतन संहिता अधिनियम, 2019 च्या कलम 67 अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये वेतन संहिता नियम, 2020, 7 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने, राज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या वेतन संहितच्या अुनसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या वेतन संहिता नियम, 2020 च्या कलम 67 अनुसार राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात (www.dgps.maharashtra.gov.in) आणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटना, कामगार वर्ग, मालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियम, 2021 बाबत सूचना आणि हरकती कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, ब्रांदा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.
००००
No comments:
Post a Comment