Tuesday, 23 June 2026

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणा

 वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणा                                                                                                    - वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 23 : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवत असून पुढील 42 महिन्यांत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली

विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी मानव वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत शासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या सूचनेदरम्यान विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, निलेश राणे, सुनील प्रभु तसेच नाना पटोले यांनी उपप्रश्न उपस्थित केले. यास उत्तर देताना वन मंत्री नाईक म्हणाले की, वाघाच्या हल्ल्याच्या झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. वन विभागाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सतर्क केले जात असून जंगलात जाण्याबाबत वेळेचे निर्बंध आणि जनजागृतीही केली जात आहे.

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार

 ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार

– गृह राज्यमंत्री योगेश कदम

        मुंबई, दि. २३ : राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

            विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सना मलिक, अतुल भातखळकर, जयंत पाटील, मनीषा चौधरी, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

            राज्यमंत्री कदम म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी ही सर्व नागरिकांसाठी समान न्याय सुनिश्चित करण्यासाठी आहे. सर्व धर्मीयांना समान न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. नाशिकमध्ये ८ मे २०२६ रोजी एका महिलेने तिच्या पतीकडून फोनवर तलाक दिल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी सध्या अटकेत आहे

            राज्यात ट्रिपल तलाकच्या तक्रारींची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये अशा स्वरूपाचे ४२ गुन्हे दाखल झाले असून सर्व तक्रारी सत्य असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणांमध्ये १५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली, तर २०२५ मध्ये ३९ गुन्हे दाखल झाले असून १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आणि ९५ जणांना अटक करण्यात आली. या प्रश्नाकडे राजकारण किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. केंद्र शासनाने लागू केलेल्या ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्यामुळे फोन, संदेश किंवा ई-मेलद्वारे तलाक देण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

            समान नागरी कायदा (यूसीसी) संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य शासन या विषयाबाबत सकारात्मक असून यूसीसीचा मसुदा, अभ्यास आणि अभिप्रायासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यात यूसीसी लागू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल

            बहुपत्नीत्वाच्या (पॉलिगामी) प्रश्नावर राज्यमंत्री कदम म्हणाले की, यूसीसी लागू झाल्यानंतर विवाहविषयक समान नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यावेळी बहुपत्नीत्वासंदर्भातील आवश्यक तरतुदी आणि निर्बंधांचाही विचार केला जाईल. मुस्लिम महिलांना संरक्षण आणि न्याय देण्याबाबत सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करणार

 अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकांवर

परवाना निलंबनाची कारवाई करणार

- 

 

            मुंबई, दि. २३:-  राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक मालकांनी  बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

 

            सदस्य शंकर जगताप यांनी विधानसभेत याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

 

            मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बसेस संवर्गातील सर्व वाहनांची वायू वेग पथकामार्फत नियमित तपासणी करुन दोषींवर कारवाई केली जाते. मात्र, यापुढे वारंवार नियमांचे उल्लंघन  करणाऱ्या दोषी वाहन चालक आणि मालकांवर थेट  मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार कारवाई करण्यात येणार येणार आहे. यापुढे पहिल्या उल्लंघनासाठी ७ ते १० दिवस, दुसऱ्या उल्लंघनासाठी १० ते १५ दिवस, तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १५ ते ३० दिवस आणि  चौथ्यांदा उल्लंघन केल्यास  परवाना थेट रद्द केला जाईल.

 

            मंत्री सरनाईक म्हणाले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जात असून वायू वेग पथकामार्फत २०२५- २०२६ मध्ये मालवाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेस संवर्गातील ५,७२८ दोषी वाहनांवर  कारवाई केली आहे. ४६१.७८ लाख इतका दंड वसूल केला आहे.  तसेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ पर्यंत १४५४ दोषी वाहनांवर कारवाई केली असून ७८.१८ लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

 

            राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील पदपथांवर अनधिकृतपणे बसेस थांबवल्या जाऊ नयेत यासाठी  या जागेच्या मालकी हक्काबाबत महापालिकांकडून माहिती मागवण्यात आली असून भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  महानगरपालिकांना अधिकृत बस थांबे तयार करण्यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

 

            मंत्री  सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाने ८३०० बसेस घेतल्या असल्याने सध्या एसटी बसेसची कमतरता नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागासाठी अधिकच्या एसटी बसेसची मागणी केल्यास त्यांनाही त्या उपलब्ध करून दिल्या जातील असेही परिवहन मंत्री म्हणाले.

१ जानेवारी २०११ पूर्वी असलेल्या अतिक्रमण धारकांना नियमित करण्यात येऊन त्यांना मालकी हक्क वितरीत

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या अभियानांतर्गत १ जानेवारी २०११ पूर्वी असलेल्या अतिक्रमण धारकांना नियमित करण्यात येऊन त्यांना मालकी हक्क वितरीत करण्यात यावे. अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त २१, २२ व २३ जुलै २०२६ रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय शिबिर घेण्यात यावे. संबंधित मतदारसंघातील जनतेची निकड लक्षात घेता शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना लाभ द्यावा. यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर शिबिराचा विषय लाभार्थ्यांची होणारी संख्या ठिकाण आणि दिनांक याबाबत रूपरेषा ठरविण्यात यावी.

महाराजस्व अभियानातून सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन

 महाराजस्व अभियानातून सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

·         छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान बैठक

 

मुंबई, दि. २२ : महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात पुढे येऊन यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्न सुटले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन नक्कीच घडणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनातील कामकाज सल्लागार समिती कक्षात आयोजित बैठकीत व्यक्त केला.

बैठकीला अभियानाच्या समितीतील विधान परिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार प्रज्ञा राजीव सातव, आमदार माधवी नाईक, आमदार प्रवीण दरेकर,  प्रमोद जठार,  श्रीकांत भारतीय, संजय भेंडे, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, हेमंत पाटील, विक्रांत पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार प्रसाद लाड, आमदार मनिषाताई कायंदे, योगेश टिळेकर, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त यांनी बैठकीत सहभाग घेतला.

आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक

 आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या

 विविध मागण्यांबाबत सकारात्मक

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबई, दि. २२ : अनुदानित व शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच आदिवासी उपयोजना (टीएसपी) क्षेत्रातील अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस माजी आमदार श्रीकांत देशपांडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अध्यापनाचे नियोजन, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, निरीक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक मूल्यमापन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आश्रमशाळांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. रास्त मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येतील, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 

अहिल्यानगर शहरातील सीना नदीच्या पुनर्जीवन कामास गती देण्याचे निर्देश

 अहिल्यानगर शहरातील सीना नदीच्या पुनर्जीवन कामास गती देण्याचे निर्देश

 

अहिल्यानगर महानगरपालिका यांच्यामार्फत शहरातील सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) विखे पाटील यांनी सांगितले.

 

जलसंपदा विभाग व अहिल्यानगर महानगरपालिका, यांच्या समन्वयाने शहरातील काटवन खंडोबा आणि शहर हद्दीतील सीना नदीची पुनर्जीवन काम करण्यात येत आहे. नदीच्या पुर्व व पश्चिम दोन्ही बाजुस काम करण्यात येणार आहे. या कामाची जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन नुकतीच ८ जून रोजी पाहणी केली.

 नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

Featured post

Lakshvedhi