महाराजस्व अभियानातून सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
· छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान बैठक
मुंबई, दि. २२ : महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात पुढे येऊन यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्न सुटले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन नक्कीच घडणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनातील कामकाज सल्लागार समिती कक्षात आयोजित बैठकीत व्यक्त केला.
बैठकीला अभियानाच्या समितीतील विधान परिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार प्रज्ञा राजीव सातव, आमदार माधवी नाईक, आमदार प्रवीण दरेकर, प्रमोद जठार, श्रीकांत भारतीय, संजय भेंडे, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, हेमंत पाटील, विक्रांत पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार प्रसाद लाड, आमदार मनिषाताई कायंदे, योगेश टिळेकर, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त यांनी बैठकीत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment