Monday, 27 April 2026

आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे सार्वजनिक आरोग्य मंत्री

 आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे

पुनरुज्जीवन करावे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुबई दि .२६राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून  देण्यासाठी कार्यरत असलेल्यारुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS),  ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे.  सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी यासर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी दिले .

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने  ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते.

ग्रामीण भागासाठी ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC)”  व शहरी भागासाठी महिला आरोग्य समिती (MAS) कार्यरत आहे.  या समित्या स्वच्छतापोषणपाणीपुरवठातसेच प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात महत्वाची भूमिका  बजावत असतात.

त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती (JAS) व रुग्ण कल्याण समिती (RKS) या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवासेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून  ग्रामपंचायत सरपंचग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला)बचत गटतरुण मंडळवन सुरक्षा समितीमहिला मंडळ,  सामाजिक संस्थागरोदर व स्तनदा मातातीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्‍य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण  यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.

शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याणसामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.

Saturday, 25 April 2026

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

 गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा

टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३: भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी, गोसीखुर्द मुख्य अभियंता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटनाच्या कामाचा आढावा घेतला. टप्पा एक मध्ये सुरू असलेल्या जेट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दुसरा टप्प्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी नागपूर ते भंडारा रोड या दरम्यान धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोबाबतही चर्चा करण्यात आली. ही मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना महारेल, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेल्यास त्याचा फायदा जिल्ह्याला होईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Friday, 24 April 2026

व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार

 व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २३ : रिक्षाटॅक्सी तसेच ई-बाईक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावायासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेशी निगडीत साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरमराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसलेराज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे तसेच तज्ज्ञसाहित्यिक उपस्थित होते.

 

वाहनचालकांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेचमुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीअसे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Thursday, 23 April 2026

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 

उदंचन प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची राज्यात क्षमता निर्माण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

तीन प्रकल्पातून ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार

१११० रोजगार निर्मिती होणार

राज्यातील उदंचन प्रकल्पांची ८० हजार मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता

 

मुंबईदि. २३ - जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा आज  सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा सचिव संजय बेलसरेआमदार डॉ. विनय कोरेनवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव एच. पाटीलमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदि उपस्थित होते.

Wednesday, 22 April 2026

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिलजिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity

 मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिल

मुंबईदि. 22 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity@gmail.com या ईमेलवर करावे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू घडवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत शुटींग, टेबल टेनिस व वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात येत आहे.

या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक प्राप्त व विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर स्पर्धा सहभाग घेतलेले इच्छुक खेळाडुंनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी  नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  निलेश गराटे  (9702212925) साहिल उतेकर  (9702171004)  समृद्धी देवळेकर  (8779727571) यांच्याकडे संपर्क साधावा.


तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

 तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी;

भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

·         विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपान मध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध

·         राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि. 22:  विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनीजपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमतासंवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढेल. परिणामीपरदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईलअसे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या  उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीतंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईककॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत एन.सीआयआयचे राज्य प्रमुख पुष्कर हाथेतसेच सीआयआय आंतरराष्ट्रीय भाषा विभागाचे प्रमुख नवोनील डी. आणि दयाल कांगणे उपस्थित होते

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो

 काही वर्षांपासून परीक्षा निकालातील विलंबगुणपत्रिकांमधील त्रुटी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे उपस्थित राहण्याची अट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सातत्याने आढावा बैठका घेतल्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनुभवी शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजनीश कामत यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कामत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्या समन्वयातून विद्यापीठाने तब्बल 85 टक्के परीक्षा निकाल यशस्वीपणे जाहीर केले. या कामगिरीसह ई-निरसन’ प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो. या क्रमांकाच्या सहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यस्थिती कधीहीकुठूनही तपासू शकतो. तक्रार कोणत्या विभागाकडे आहेकोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईलया सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.

Featured post

Lakshvedhi