Saturday, 25 July 2026

भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्याच्या मागणीच्या अनुषंगाने

 भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्याच्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आंतर राज्य लवादाच्या निर्णयाची बंधने पाळतानाच त्यातून मार्ग काढून कशा पद्धतीने हे बंधारे तयार करता येतील, या संदर्भातले निर्देश संबंधित विभागाला देण्यात येईल. तसेच चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे, तो आता ‘पूल कम बंधारा’ असा परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसे  अडवता येईल, याचाही प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

 

महा विस्तार’ म्हणजे एक प्रकारचा एआय एजंट असून आपण त्याच्याशी संवाद साधून शेतीशी संबंधित

 महा विस्तार’ म्हणजे एक प्रकारचा एआय एजंट असून आपण त्याच्याशी संवाद साधून शेतीशी संबंधित खतांचा वापर, कीड प्रतिबंध, पाण्याचा वापर आदी सर्व विषयांवरील प्रश्नांची उत्तरे, ज्ञान, माहिती जाणून घेऊ शकता. आधुनिक शेतीच्या प्रयोगाचे व्हिडिओ त्याच्यावर आहेत.  कुठल्याही नवीन पीक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती त्यात असून सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बोली भाषेत पर्सनलाईझ्ड पद्धतीने तेथे मिळते. पुढील काळात ‘माती परीक्षण’पासून सर्व सुविधा, पद्धती या केवळ आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शेतीमध्ये ‘एआय’ला चालना; ‘महा विस्तार’ ॲपचा वापर करावा

 शेतीमध्ये ‘एआय’ला चालना; ‘महा विस्तार’ ॲपचा वापर करावा

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे, उत्पादनाचा खर्च कमी करता आला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा वाढला पाहिजे, अशा पद्धतीने आपण राज्यात वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचे (एआय) महत्व ओळखून, देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरिता ‘महा विस्तार’ नावाचे एआय ॲप तयार केले आहे. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी महा विस्तारवर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ॲपवर नोंदणी करून उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाची

 २०१५-१६ मध्ये दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली. पंढरपूरला येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत शेतीच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग पोहोचले पाहिजेत, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली. राज्यातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये गणना होत असलेली ही  बाजार समिती अतिशय उत्तम कारभार करत असून १६ कोटींपासून प्रचंड मोठी भरारी घेत समितीने मोठा विस्तार केलेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाजार समितीचा गौरव केला.

 

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत सर्वांचे १०० टक्के पुनर्वसन

 पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत सर्वांचे १०० टक्के पुनर्वसन

      पंढरपूरच्या कॉरिडॉर विकासाची जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. काही थोड्या लोकांच्या मनात शंका असल्या तरी चर्चेतून त्या सर्व शंका दूर करून   सर्वांचे चांगल्यात चांगले पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देत आहोत. १०० टक्के लोकांचे समाधान करण्याचा उद्देश घेऊन हे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.

 

विक्रमी असे ३५ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरला येत आहेत. जवळजवळ २१ किलोमीटरची दर्शनाची

 विक्रमी असे ३५ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरला येत आहेत. जवळजवळ २१ किलोमीटरची दर्शनाची रांग यावेळी लागलेली आहे. मात्र राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिशय उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकऱ्यांच्या निवाससाठी जर्मन हँगर्स, तेथे पाद्य सेवा, वैद्यकीय सेवा आदी सर्व प्रकारच्या सेवा अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. वारीची परंपरा अशीच वाढत राहणार असून त्याप्रमाणे दरवर्षी सुविधा देण्याचे काम करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

कोणी कळस दर्शन, कोणी मुख दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाची भेट झाल्याचा

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा शतकानुशतके चालली असून दरवर्षी लाखो वारकरी चालत चालत पंढरपूरपर्यंत येतात. वारीमध्ये प्रत्येकालाच पांडुरंगाचे दर्शन मिळतेच असे नसले तरी कोणी कळस दर्शन, कोणी मुख दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाची भेट झाल्याचा अनुभव प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी प्राप्त होतो. वारीच्या परंपरेत प्रत्येक व्यक्ती समोरचा वारकरी, व्यक्तीमध्ये आपल्या माऊलीचे दर्शन घेत असतो. आणि अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक असा वारीचा सोहळा आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो.


Featured post

Lakshvedhi