Wednesday, 1 July 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्यात येणार

 अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात येणार

 

मुंबई, दि.३० : अनुसूचित जातींतील मागास राहिलेल्या घटकांना न्याय मिळावा यासाठी उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत व्यापक चर्चा, सूचना व हरकती विचारात घेतल्यानंतरच राज्य शासन याबाबत अंतिम निर्णय घेईल.  तसेच याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले.

 

            अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बदर समितीचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवून त्यावर चर्चा करावी आणि त्यानंतरच विधेयक आणावे, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

एमएसआरडीसीमार्फत होणाऱ्या निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व शासनाच्या विहित नियमांनुसार पारदर्शक

 एमएसआरडीसीमार्फत होणाऱ्या निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व शासनाच्या विहित नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने राबविल्या जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची अंतिम निविदा झालेली नसून फेरनिविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री भोसले यांनी जनभावना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करूनच प्रकल्पाची पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

 

रस्ते, पूल, विश्रामगृहे व पायाभूत सुविधा विकासाला गती देणार

 रस्ते, पूल, विश्रामगृहे व पायाभूत सुविधा विकासाला गती देणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

 

मुंबई, दि. ३० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांतील रस्ते, पूल, शासकीय इमारती व इतर पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

 

सभागृहातील सदस्यांनी मांडलेल्या सूचनांना उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी, पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या १०० दिवसांत दर्जेदार रस्ते विकसित केल्याचा उल्लेख करून दुसऱ्या टप्प्यातील कामेही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. विधानसभा सदस्यांनी सुचविलेल्या विविध मतदारसंघांतील रस्ते, पूल, विश्रामगृहे, कर्मचारी निवासस्थाने आणि न्यायालयीन इमारतींसंदर्भातील प्रस्ताव निधीची उपलब्धता व निकषांनुसार विचारात घेतले जातील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

मुंबईतील एसआरए आणि समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) प्रकल्पांना गती देण्यासाठी एक खिडकी

 मुंबईतील एसआरए आणि समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) प्रकल्पांना गती देण्यासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे मंजुरी प्रक्रिया जलद करण्यात येत असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. मुंबई व उपनगरांतील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यास शासन प्राधान्य देत असल्याचे नमूद करून सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गृहनिर्माण क्षेत्रातील विविध योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध

 गृहनिर्माण क्षेत्रातील विविध योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध

-मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. ३० : गृहनिर्माण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पुनर्विकास प्रकल्प, गिरणी कामगारांची घरे तसेच एसआरए योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध स्तरांवर आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.

मंत्री देसाई म्हणाले की, दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींच्या दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास (म्हाडा) देण्यात येतील. तसेच गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.

विविध प्रकल्पांबाबत माहिती देताना मंत्री देसाई म्हणाले की,  ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि पुनर्विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियंत्रण समित्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४० हजार घरकुलांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच मुंबईत नोकरदार महिलांसाठी सुमारे १५० क्षमतेच्या वसतिगृहाच्या उभारणीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. अमरावती येथे परवडणाऱ्या भाडेतत्त्वावरील आठ हजार घरांचा प्रकल्पही मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील जुन्या व जीर्ण उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत कार्यवाही सुरू असून पात्र रहिवाशांना पुनर्विकासातून उपलब्ध होणाऱ्या सदनिका देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील एसआरए आणि समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) प्रकल्पांना गती देण्यासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे मंजुरी प्रक्रिया जलद करण्यात येत असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. मुंबई व उपनगरांतील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यास शासन प्राधान्य देत असल्याचे नमूद करून सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

भिवंडीतील वीज वितरण फ्रॅंचायजी मॉडेल राज्यासाठी अत्यंत यशस्वी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भिवंडीतील वीज वितरण फ्रॅंचायजी मॉडेल राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. यामुळे वीज वितरण हानी ४५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे  खासगीकरण आणि फ्रँचायझी मॉडेल यात फरक आहे. फ्रँचायझी मॉडेलमध्ये कंपनीची मालकी कायम असते आणि वीज दर हे एमईआरसी द्वारेच ठरवले जातात. त्यामुळे फ्रँचायझी चालक मनमानी दराने वीज विक्री करू शकत नाहीत. भिवंडीतील वितरण हानीमध्ये सुधारणा झाली असून  पूर्वी ४५ टक्के असलेली हानी आता १० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच वीज बिल वसुली ६५-६६ टक्क्यांवरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  वीज निर्मितीसाठी मागणी करण्यात आलेल्या ११०% स्कीमबाबत एमईआरसी. कडे प्रस्ताव पाठवून, त्यांच्या मान्यतेने ही योजना पुन्हा राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

 

            तसेच भिवंडीतील फ्रँचायझीचा करार संपल्यानंतर पुढील धोरण काय असावे, याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीचे अवलोकन करून गुणवत्तेच्या आधारावर घेतला जाईल, ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी ओटीएस आणि पॉवर लूमच्या अडचणी सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वीज वितरणासाठीचा भिवंडी पॅटर्न यशस्वी; वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यास शासन कटिबद्ध

 वीज वितरणासाठीचा भिवंडी पॅटर्न यशस्वी;

वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यास शासन कटिबद्ध

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि.३० : भिवंडीतील वीज वितरण फ्रँचायझी मॉडेल हे राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले असून, पूर्वी १६ तास उपलब्ध असलेली वीज आता २३ तास ५६ मिनिटांपर्यंत पोहोचली आहे. घरगुती मीटरवर पॉवर लूम चालवल्यामुळे अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. यावर तांत्रिक बाबी बाजूला ठेवून, ग्राहकांना दिलासा देणारा नवीन मार्ग किंवा योजना आखली जाईल. ही योजनाही एमईआरसीच्या मंजुरीसाठी सादर केली जाईल, वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

            विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात भिवंडीतील वीज वितरण व्यवस्थेबाबत  सदस्य रईस शेख यांनी  उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 

Featured post

Lakshvedhi