Sunday, 21 June 2026

भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

 भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

·         अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या

अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन

नागपूर, दि. १९ - देशाला भविष्यात संरक्षणसज्ज ठेवायचे असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्र इंडियाचा अत्याधुनिक अॅल्युमिनिअम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प भारताचे आयात अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला मोठी चालना मिळेल आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयुक्त सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांच्यासह संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनक्षमतेला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र कार्यक्रम, अंतराळ संशोधन, विमान उद्योग, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेले मोठ्या आकाराचे व गुंतागुंतीचे अॅल्युमिनियम मिश्रधातू घटक या प्रकल्पातून तयार करता येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अशा अॅल्युमिनियम घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Yoga is a Panacea for Keeping Diseases at Bay

 Yoga is a Panacea for Keeping Diseases at Bay

                                                                                    – Chief Minister Devendra Fadnavis

Mumbai, June 21: With changes in lifestyle, the incidence of diseases has increased significantly in recent times. Yoga is a panacea for preventing such lifestyle-related diseases. Therefore, everyone should practise yoga regularly to stay healthy, Chief Minister Devendra Fadnavis said while underscoring the importance of yoga.

He was speaking at the 12th International Day of Yoga programme organised near the Food Court at Juhu Beach. Chairman of the Legislative Council Prof. Ram Shinde, Member of Parliament Ravindra Waikar, MLA Amit Satam, Shivprakash, Keshav Upadhye, Pawan Tripathi, Deepti Waikar, Usha Ben and others were present on the dais.

The Chief Minister said that a person who practises yoga consistently is capable of successfully facing challenges under any mental circumstances. He stressed the need to promote and popularise the science of yoga. He also appealed to people to practise yoga regularly to keep their bodies healthy and their minds calm and cheerful.

आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय

 आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 21: जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित 12 व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर, उषा बेन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातत्याने योग करणारा व्यक्ती हा कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये असली तरी आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकतो. त्यामुळे योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. नियमितपणे योग करून आपण आपले शरीर निरोगी व मन प्रसन्न ठेवूया, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताने मांडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीत आणि कुठलाही विरोध न होता मंजूर झालेला हा प्रस्ताव आहे. भारताने दिलेल्या प्रस्तावानुसार आज जगभरात योग होत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व जगाला पटले आहे. विश्वामध्ये योग विद्या आणि योग चिकित्सेबदल मोठे कुतूहल निर्माण झाले असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

व्यक्ती ही केवळ शरीर नसून मन आणि आत्मा सुद्धा असल्याचे अधोरेखित करीत मुख्यमंत्री म्हणाले, माणसाचे मन निसर्गाशी जुळलेले आहे. त्यामुळेच योग विद्येमध्ये केवळ शरीराचा विचार न करता मन, आत्मा आणि शरीर या तिन्हींचा विचार करण्यात आलेला आहे. योग विद्येमध्ये मनाचा निसर्गातील तत्वांशी असलेला संबंध हा पुनर्जीवित करण्यात येतो. सातत्यपूर्ण योग केल्याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यावरही होतो.

पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले पहिले पाच जिल्हे

 पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले पहिले पाच जिल्हे

अहिल्यानगर  (लाभार्थी 5,45,481 व एकूण रक्कम 109.32)

सोलापूर (लाभार्थी 4,94,447 व एकूण रक्कम 98.89)

कोल्हापूर (लाभार्थी 4,60,687 व एकूण रक्कम 92.19)

सातारा (लाभार्थी 4,36,055 व एकूण रक्कम 87.22)

पुणे ( लाभार्थी 4,30,519 व एकूण रक्कम 86.10)

नाशिक (लाभार्थी 4,26,540 व एकूण रक्कम 85.34)

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

 राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर

मोठा दिलासा मिळणार

-         कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

·         प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

·         राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

      मुंबई, दि. २० जून  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

       मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

      कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांतर्फे आभार व्यक्त करतो.

     महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ₹४१,०८३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे ₹१,८१७ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते. 

      या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच सहकारी संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले.

       केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवसम्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरमोठा दिलासा मिळणार

 राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरमोठा दिलासा मिळणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

· प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

· राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

      मुंबई, दि. २० जून : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

       मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

      कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांतर्फे आभार व्यक्त करतो.”

     महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ₹४१,०८३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे ₹१,८१७ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते. 

      या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच सहकारी संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले.

       केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी

 अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

महाबीजच्या एकूण 723 पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मान्यता.

मुंबई, दि.16 : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे.  हा आकृतीबंध अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, कृषी विभागाने याबाबत आज शासन निर्णय जारी केला असून, एकूण 723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

शासन निर्णयानुसार महाबीजच्या विद्यमान आकृतीबंधामध्ये सुधारणा करून 560 नियमित पदे, 100 अधिसंख्य पदे आणि 63 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना कृषी मंत्री म्हणाले, "शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे."

यापूर्वी, 30 ऑक्टोबर 2014 रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात एकूण 737 पदे होती. नव्या सुधारित आकृतीबंधात संस्थेच्या सध्याच्या गरजा, तांत्रिक बदल आणि कार्यपद्धतीतील सुधारणा लक्षात घेऊन पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात मंजूर नियमित पदांची संख्या 560 इतकीच राहणार आहे.

सुधारित आकृतीबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहरेकरी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे

Featured post

Lakshvedhi