Tuesday, 9 June 2026

विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढत असून शाळांमध्ये लक्षणीय बदल

 मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढत असून शाळांमध्ये लक्षणीय बदल घडत आहे. शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याची राज्यासह देशपातळीवर दखल घेतली जात  आहे.

मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात केवळ अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे.  हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अमंलबजावणी करावी.

शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि भागीदार संघटनांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत नव्हे तर सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी मूल्य शिक्षणाची चळवळ येत्या काळात व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.

सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज

 सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी

मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (2.0) अंमलबजावणी व्यापकस्तरावर करण्याचे निर्देश

•       मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

मुंबई, दि. 8 : शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे.सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची  (2.0) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनाचा आढावा घेण्यात आला त्या वेळी ते बालत होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. राज्यमंत्री पंकज भोयर,  उपस्थित होते.

मुंबईतील आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी डायलिसिस केंद्रांची संख्या वाढविणे, ‘मधुमेहमुक्त मुंबई’ अभियान सुरू करणे, मानसिक आरोग्य केंद्रे

 आमदार अमित साटम यांनी मुंबईतील आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी डायलिसिस केंद्रांची संख्या वाढविणे, ‘मधुमेहमुक्त मुंबईअभियान सुरू करणे, मानसिक आरोग्य केंद्रे उभारणे आणि प्रस्तावित कर्करोग उपचार सुविधा वेळेत कार्यान्वित करण्याची मागणी केली. आगामी काळात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुमारे पाच हजार नवीन रुग्णखटा उपलब्ध होणार असल्याने डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे नियोजन आतापासूनच करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे आधुनिकीकरण, मनुष्यबळ बळकटीकरण, रुग्णालयांच्या पुनर्विकासाला गती आणि तंत्रज्ञानाधारित सेवा विस्तार या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जाईल, असा पुनरुच्चार पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर ‘महापौर वैद्यकीय सहायता कक्ष’ स्थापन करून रुग्णांना

 महापौर रितू तावडे यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त केली. कोविड काळात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावलेल्या मनुष्यबळाला भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. सिद्धार्थ, राजावाडी आणि इतर रुग्णालयांच्या रखडलेल्या पुनर्विकास कामांना गती देण्याबरोबरच नर्सिंग कॉटेज, झिरो प्रिस्क्रिप्शन सेवा, कूपर रुग्णालयात ईएमएस वॉर्ड, केईएममध्ये एआरटी विभाग आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेला दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता कक्षस्थापन करून रुग्णांना मदत करण्यासाठी पारदर्शक आणि सुलभ व्यवस्था विकसित करण्याचा प्रस्तावही महापौरांनी मांडला.

मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा

 मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा

- पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. 8 : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविणारा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. महानगरपालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि स्वच्छतागृहांची स्थिती तातडीने सुधारण्याचे आदेश देत आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांनुसार आरोग्य सेवा उभारण्यासाठी आर्थिक तरतुदींपलीकडे जाऊन आधुनिक मेडिटेकतंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Monday, 8 June 2026

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार ; नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

 वृत्त 2056

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार ;

नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब

नियोजित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे

 

मुंबई, दि. 8 : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे.  ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना, अजित बारोडिया तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. सरदाना यांनी यावेळी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

 

Featured post

Lakshvedhi