Sunday, 7 June 2026

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

  

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त

दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जे.जे. रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका धायतडक यांनी दृष्टिदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध गैरसमजांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. ९ जून आणि बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत न्युज ऑन AIR या ॲपवर देखील प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.

            दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान देणगी असून अनेक व्यक्ती कॉर्नियाच्या अंधत्वामुळे दृष्टीपासून वंचित राहतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्यासाठी दृष्टिदान ही अत्यंत महत्त्वाची आणि समाजोपयोगी चळवळ आहे. अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे, यासाठी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो.

त्याअनुषंगाने 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. धायतडक यांनी दृष्टिदान म्हणजे नेमके काय, नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते, कोण व्यक्ती नेत्रदान करू शकते, तसेच नेत्रदानाबाबत समाजात असलेले विविध समज-गैरसमज यावर सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय मृत्यूनंतर अल्पावधीत नेत्रदान करण्याचे महत्त्व आणि त्यातून अंधत्वग्रस्त व्यक्तींच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी · 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त · १९२ व्यक्तींना अटक

 राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी

·         1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त

·          १९२ व्यक्तींना अटक

 

मुंबई, दि. 7 : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. 1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. 

मोहिमेत 3 जून 2026 रोजी सोनगीर, जि. धुळे येथे टाकण्यात आलेल्या धाडीत 23 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

4 जून 2026 रोजी समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाका येथे करण्यात आलेल्या कारवाईत 60 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन तर नांदेड येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत 17 लाख 52 हजार 450 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त करण्यात आले. तसेच मोशी, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आलेल्या कारवाईत 6 लाख 19 हजार 982 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून सहा व्यक्तींविरुद्ध चिखली, पिंपरी-चिंचवड या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जून 2026 रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 रुपये किंमतीचा साठा परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव येथे जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रात 30 धाडीमध्ये 3 लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्षेत्रात 79 धाडीमध्ये 8 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 78 व्यक्तींना अटक केली आहे, असे सह आयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी कळविले आहे.

14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान

 14 खेळाडूंना खासदार क्रीडा भूषण पुरस्कारप्रदान

विविध क्रीडा प्रकारांतील 14 खेळाडूंनाखासदार क्रीडा भूषण पुरस्कार तसेच विशेष पुरस्कार प्रदान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. व्हॉलीबॉल : कर्मण्य  चिलकुलवार, अॅथलेटिक्स : अंजली मडावी, खो-खो : सिद्धेश सातपुते , सॉफ्टबॉल : उर्वशी सनेश्वर, हँडबॉल : हरप्रीतसिंग रंधावा, कबड्डी : मंगला ढबाले , स्केटिंग : अदिती धांडे, बुद्धिबळ : श्रद्धा बजाज, कुस्ती : नंदिनी साहू, बॅडमिंटन : निशिका गोखे, योगासन : भरत डेलिकर , बास्केटबॉल : गुंजन मंत्री , जिम्नॅस्टिक : अवनी राठोड, जलतरण : अदित्री पयासी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले

यंदा काही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे यांना तर उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग यांना तसेच क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हणून यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना गौरविण्यात आले.


जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी 45 कोटींची तरतूद

 जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी 45 कोटींची तरतूद

-

नागपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. खासदार क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजक समितीचे अभिनंदन केले


आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

  

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

-   

आगामी खासदार महोत्सवाचे आयोजन व्यापक स्तरावर म्हणजेच विदर्भस्तरावर केले जाईल. त्यात एक लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर हे क्रीडा राजधानी म्हणून उदयास यावे यासाठी शहरातील क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहराच्या सर्वच भागात क्रीडा सुविधांची उभारणी होणार असून शहरातील किमान एक लाख मुले-मुली सायंकाळी क्रीडा मैदानावर दिसावीत, असे आमचे स्वप्न असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर

 नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

· खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपूर, दि. 7 : नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नापुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


 

Featured post

Lakshvedhi