Saturday, 6 June 2026

सार्वजनिक ग्रंथालयांना एलजीएमएस प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश -

 सार्वजनिक ग्रंथालयांना एलजीएमएस प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबई, दि.   : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टिम (एलजीएमएस) या ऑनलान प्रणालीद्वारे सादर करण्याचे   निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

 

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक ग्रंथालयांना वार्षिक अहवाल तसेच लेखापरीक्षण अहवाल एलजीएमएस प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार चालू वर्षासाठी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया ३० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

 

राज्यातील सर्व सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रंथालयांना आवश्यक मार्गदर्शन करून वार्षिक अहवाल अचूक व वेळेत सादर होतील यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

 

तसेच, विहित मुदतीत अहवाल सादर न करणाऱ्या किंवा अपूर्ण अथवा चुकीची माहिती सादर करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदान मंजूर करण्यात येणार नसल्याचा इशाराही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सर्व संबंधित ग्रंथालयांनी वेळेत माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एलजीएमएस प्रणालीवर माहिती भरताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्रंथालय व्यवस्थापन अधिक पारदर्शक व डिजिटल करण्याच्या दृष्टीने शासनाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे.

ग्रंथालय संचालनालयांतर्गत हस्तलिखित सल्लागार समिती गठीत

 ग्रंथालय संचालनालयांतर्गत हस्तलिखित सल्लागार समिती गठीत

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबई, दि. ५ :  महाराष्ट्रातील दुर्मीळ हस्तलिखिते, प्राचीन ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संवर्धन व जतन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हस्तलिखित सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. यामुळे  हस्तलिखितांच्या संवर्धनाला चालना मिळाल्यास भावी पिढ्यांसाठी अमूल्य ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

 

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अंतर्गत ग्रंथालयांमध्ये जतन करण्यात येणाऱ्या जुन्या व दुर्मीळ पुस्तकांसह हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने समिती स्थापन केली असून  समितीच्या अध्यक्षपदी ग्रंथालय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. ही समिती पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.

 

या समितीमध्ये पद्मश्री डॉ. अच्युत पालव, संशोधक तेजस्विनी सचिन पाठक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे डॉ. श्रीनंद लक्ष्मण बापट, इतिहासतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित तसेच डेक्कन कॉलेजचे प्रा. अभिजित दांडेकर अशा तज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी (हस्तलिखित विभाग) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. विविध क्षेत्रांतील हस्तलिखित केलेले जुनी व दुर्मीळ पुस्तके, नियतकालिके व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच आणि  इतर कागदपत्रे शासनास मिळवून देण्यासाठी समिती काम करेल. समितीच्या प्रतिवर्षी किमान दोन बैठका अध्यक्षांच्या अनुमतीने घेण्यात येतील.

 

 समितीचे कार्य पुढील प्रमाणे असेल

जुनी व दुर्मीळ पुस्तके, नियतकालिके, हस्तलिखिते व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे असतील असे इतर कागदपत्र शासनास मिळवून देणे.

खरेदी करावयाच्या हस्तलिखितांची व दुर्मीळ ग्रंथांची योग्य किंमत ठरविणे.

हस्तलिखित संग्रहालयाच्या अनुषंगिक सर्व बाबी संबधित शासनास सल्ला देणे.

ही समितीला दरवर्षी किमान दोन बैठका घेणे आवश्यक असून वेळोवेळी अहवाल शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे .

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा

  

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

·         मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

 

मुंबई, दि. ५ : बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

 

यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यास सांगितले. तसेच आगामी काळात वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षांची आवश्यक ती छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशाही सूचना दिल्या.

 

शहरातील तसेच तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत तहसीलदारांनाही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·         वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचा निर्णय

·         क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी 'व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट' घोषित करणार

 

ठाणे, दि. ५: ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी क्लस्टर योजनेला गती देण्याच निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी ही योजना महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे हस्तातंरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ठाणे एमआयडीसीची ६०.७२ हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसन प्रकल्पासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे निर्देश देतानाच ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना 'व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट' घोषित करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे समह विकास प्रकल्प आणि एमआयडीसीबाबत आढावा घेतला. ठाणे समह विकास प्रकल्प आता महाप्रीतऐवजी एमएसआरडीसीकडून करण्यात येणार असल्याचे सांगत या बदलासाठी आवश्यक असणारी हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. 

ठाणे समह विकास प्रकल्प हा देशातील पहिला भव्य समूह विकास प्रकल्प असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे शहराचा हा समूह विकास प्रकल्प नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळवून देणारा ठरेल. हा केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प नसून, नागरिकांचे जीवनमान उंचावणारा समूह विकास प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.


नमस्कार भूमी २"’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

 "नमस्कार भूमी २"या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते नमस्कार भूमी २या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच त्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रेरणा गीताचे अनावरण करण्यात आले.

 

यावेळी राज्यपालांनी भावना फाउंडेशनतर्फे तयार करण्यात आलेल्या भूमी नमस्कारया प्रेरणादायी गीताचे विशेष कौतुक केले. हे गीत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारे असून व्यापक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 प्लास्टिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.

 

यावेळी आमदार सचिन आहेर, महाराणा प्रताप यांचे वंशज मेवाडचे श्रीजी लक्षप्रताप महाराज, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक अनिल गायकवाड, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, गौर गोपाल दास अभिनेते सोनू सूद, गायक शंकर महादेवन, अभिनेत्री मलायका अरोरा, रूपा गांगुली, गायक बादशाह, संगीतकार हिमेश रेशमिया, गायिका नेहा कक्कर, सीमा सिंग, विजय कारिया तसेच भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

नमस्कार भूमी २"’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

 "नमस्कार भूमी २"या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते नमस्कार भूमी २या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच त्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रेरणा गीताचे अनावरण करण्यात आले.

 

यावेळी राज्यपालांनी भावना फाउंडेशनतर्फे तयार करण्यात आलेल्या भूमी नमस्कारया प्रेरणादायी गीताचे विशेष कौतुक केले. हे गीत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारे असून व्यापक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 प्लास्टिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.

Friday, 5 June 2026

मुंबईच्या वेशीवरील ऑक्ट्रोय नाके विकसित करा

 मुंबईच्या वेशीवरील ऑक्ट्रोय नाके विकसित करा

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात बाहेरून येणाऱ्या बसेसला ऑक्ट्रोय नाक्यांवर पार्किंगची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची उभारणी करावी. त्याकरिता मुंबईच्या वेशीवरील दहिसर, मानखुर्द, मुलुंड येथील आनंद नगर, एलबीएस रस्ता, एरोली नका येथील ऑक्ट्रोय नाके विकसित करावेत. या ठिकाणी बसेस पार्किंग आणि प्रवासी चढ - उतार सुविधा निर्माण केल्यास मुंबईत शहरात खासगी बसेस आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होईल. हे नाके ट्रान्सपोर्ट हबच्या स्वरूपात विकसित करावे. एसटी महामंडळ बसेसबाबत स्वतंत्ररित्या चर्चा करून समन्वयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सादरीकरण केले.


Featured post

Lakshvedhi