Thursday, 4 June 2026

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार

 राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची

तिकिटे तिकीटालयॲपवर उपलब्ध होणार

                                                                             - मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. 4: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच अंतिम फेरीस 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने तिकीटालयॲपवरुन या स्पर्धेतील नाटकाची तिकिे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य,  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले.

 

            राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. 8 जून रोजीठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतरसविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमीआणिशंकर जयकिशनहे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

 

            मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

 

            स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर रुपये 50 आणि रुपये30 निश्चित करण्यात आले आहे.  प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी 10.00 वाजल्यापासून तिकीटालयया ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. या सुविधेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

000

सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा · हाफकिन संस्था आणि घानाच्या

 सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा

·         हाफकिन संस्था आणि घानाच्या सीपीएमआर संस्थेमध्ये धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा

मुंबई, दि.4 : सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.

हाफकिन संस्थेचे संचालक डॉ. सुवर्णा खरात तसेच संस्थेतील अजित जगताप, मृणाल घाग सावंत  यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सहभाग घेतला. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता.

बैठकीत विशेषतः सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांमध्ये सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला असून त्यावरील स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध उपचारांची गरज अधोरेखित करण्यात आली. दोन्ही संस्थांनी वनस्पतीजन्य औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे, झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे, संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, आंतरराष्ट्रीय संशोधन अनुदानांसाठी प्रस्ताव सादर करणे आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले की, जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक भागीदारीमुळे नवोन्मेषी संशोधनाला चालना मिळेल, वैज्ञानिक क्षमता अधिक बळकट होईल आणि जगभरातील लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आरोग्यविषयक उपाय विकसित करण्यास मदत होईल.

प्रस्तावित सहकार्याअंतर्गत संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त अभ्यास, तंत्रज्ञान हस्तांतरण यासंदर्भात संयुक्त प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे युवा वैज्ञानिकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ही बैठक भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया रचणारी ठरली असून भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य, जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन, विषशास्त्र आणि ट्रान्सलेशनल सायन्स या समान प्राधान्यक्रमांद्वारे दोन्ही संस्था नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींचा शोध, संशोधन परिसंस्थेचे बळकटीकरण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांतील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी संयुक्तपणे कार्य करणार आहे.

हाफकिन संस्था आणि सीपीएमआर यांच्यातील हे सहकार्य भारत-आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीचे आशादायी उदाहरण ठरणार असून जागतिक आरोग्य संशोधन क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्यास मदत होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार

 राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची

तिकिटे तिकीटालयॲपवर उपलब्ध होणार

                                                                             - मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. 4: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच अंतिम फेरीस 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने तिकीटालयॲपवरुन या स्पर्धेतील नाटकाची तिकिे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य,  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले.

 

            राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. 8 जून रोजीठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतरसविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमीआणिशंकर जयकिशनहे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

 

            मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

 

            स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर रुपये 50 आणि रुपये30 निश्चित करण्यात आले आहे.  प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी 10.00 वाजल्यापासून तिकीटालयया ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. या सुविधेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.


ओ. पी. नय्यर जन्मशताब्दीनिमित्त 7 जून रोजी विशेष संगीत रजनी विनामूल्य प्रवेशिका 6 जूनपासून उपलब्ध होणार

  

. पी. नय्यर जन्मशताब्दीनिमित्त 7 जून रोजी विशेष संगीत रजनी

 विनामूल्य प्रवेशिका 6 जूनपासून उपलब्ध होणार

 

मुंबई, दि. 4: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘...तुमसा नहीं देखाया विशेष संगीत रजनी कार्यक्रमाचे 7 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

            येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रविवार (दि. 7 जून) रात्री 8.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका 6 जून 2026 पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील. भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णयुगाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि लयबद्ध संगीतशैलीने समृद्ध करणारे संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या संगीताने हिंदी चित्रपटसंगीताला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘आईये मेहरबान’, ‘ये है बॉम्बे मेरी जान’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘जाइये आप कहाँ जायेंगेयासारखी अनेक अजरामर गीते आजही रसिकांच्या मनात लोकप्रिय आहेत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष संगीत रजनीत त्यांच्या निवडक आणि गाजलेल्या गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार आहे.

 

            गायक जय आजगांवकर, धनश्री देशपांडे, अर्चना गोरे आणि श्रीकांत नारायण हे कलाकार ओ. पी. नय्यर यांच्या बहारदार गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सत्यजीत प्रभू यांनी केले आहे. मंदार खराडे हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वय अंधश्र क्रिएशन्स यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

            . पी. नय्यर यांच्या संगीताची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यांच्या सुरावटींमधील चैतन्य; तसेच हिंदी चित्रपटसंगीताला त्यांनी दिलेले बहुमोल योगदान या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडले जाणार आहे. त्यांच्या गाजलेल्या गीतांचा आस्वाद घेताना रसिकांना हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाचा अनुभव घेता येणार असून, हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

 

            सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सांस्कृतिक वारसा, अभिजात संगीत परंपरा आणि महान कलावंतांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

            . पी. नय्यर यांच्या अविस्मरणीय संगीत वारशाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संगीतप्रेमी व रसिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करु नये

 माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करु नये

 -कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

·         नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

 

मुंबई, दि. ३ : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

 

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामगार मंत्री ॲड फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ

        गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

 

गोंदिया, दि. 3 : गोंदिया जिल्ह्यातील 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यापैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी विवाह गाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. येथील पोलीस मुख्यालयात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ नुकताच पार पडला.

 

37 वर्षीय पांडू पुसू वड्डे, रा.  तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरिया मध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता.

36 वर्षीय सैवंती रायसिंग पंधरे, रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्य प्रदेश), माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती. ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य  म्हणून कार्यरत होती.

            अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजात सन्मानाने जगण्याची, स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची इच्छा या निर्णयामागे होती.

शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनांतर्गत नमूद आत्मसमर्पित माओवाद्यांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँक खाते, आणि इतर विविध आवश्यक कागदपत्रे तयार करणे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे; तसेच त्यांचे पुनर्वसन संबंधाने इतर कार्यवाही सुरु आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून; तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतीक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण म्हणून दोन आत्मसमर्पित नक्षल सदस्य विवाहबंधनात अडकले आणि शांततामय, सन्माननीय जीवनाची नवी सुरुवात केली.

या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांनाही एक सकारात्मक संदेश मिळतो की, हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास त्यांनाही सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला आहे.

संपूर्ण विवाह सोहळा शांततापूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक, नक्षल सेल   प्रमोद भातनाते, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे,  पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल  श्रीकांत हत्तीमारे, नक्षल ऑपरेशन सेल देवरी मल्लिकार्जुन वासुदेव,  तसेच नक्षल सेल गोंदिया, इंट सेल देवरी, सी 60 पथक आणि पोलीस मुख्यालय, गोंदिया येथील पोलीस स्टाफने आवश्यक समन्वय व सहकार्य उपलब्ध करून दिले.

हा विवाह केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून परिवर्तन, पुनर्मिलन, विश्वास आणि शांततामय भविष्याच्या आशेचा उत्सव आहे - पोलीस अधीक्षक, गोंदिया

सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा · हाफकिन संस्था आणि घानाच्या सीपीएमआर संस्थेमध्ये धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा

 सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा

·         हाफकिन संस्था आणि घानाच्या सीपीएमआर संस्थेमध्ये धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा

 

मुंबई, दि.3 : सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.


Featured post

Lakshvedhi