Monday, 1 June 2026

पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना

 पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी.

 

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावेळी हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते, असे सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हिंदी पत्रकारितेसाठी योगदान दिलेल्या वरिष्ठ पत्रकार गंगाधर ढोबळे, हेमंत तिवारी, कुमुद संघवी चावरे, विनीत कुमार सिंग, अवधेश व्यास यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा.राममोहन पाठक तसेच गायक सुरेश शुक्ला यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

 

मुंबई हिंदी पत्रकार संघाचे महासचिव विजयसिंह कौशिक यांनी प्रास्ताविकात हिंदी पत्रकारितेची २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून पत्रकार संघाच्या

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना

 महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण

 मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. १ : मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, राजहंस सिंह, मुरजी पटेल, संजय उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे.  उदन्त मार्तण्डया पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.

 

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra Governor condoles demise of Suman Kalyanpur

 Maharashtra Governor condoles demise of Suman Kalyanpur

 

Mumbai Dated 1 : The Governor of Maharashtra Jishnu Dev Varma has expressed grief over the demise of renowned singer Suman Kalyanpur.

In his message, the Governor wrote "The news of the passing of renowned singer Padmabhushan Suman Kalyanpur is deeply saddening. Suman Kalyanpur’s voice had sweetness, delicacy and purity. Every song she rendered had the rare ability to touch the hearts of listeners. With her passing, the world of music has lost a divine soul. Suman Kalyanpur’s music is immortal and will continue to inspire generations to come. On behalf of the people of Maharashtra and music lovers, I pay my tributes to the departed soul.

0000

सुमन कल्याणपूर के निधन से संगीत जगत का देवालय रिक्त

 सुमन कल्याणपूर के निधन से संगीत जगत का देवालय रिक्त

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

मुंबई, दि. : महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने वरिष्ठ गायिका सुमन कल्याणपूर के निधन पर गहरा दुःख व्यक्त किया है।

राज्यपाल ने अपने शोक संदेश में कहा है कि पद्मभूषण से सम्मानित प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर के निधन का समाचार अत्यंत दुःखद है। उनके गायन में मधुरता, भावों की कोमलता और एक अद्भुत पवित्रता थी। उनके द्वारा गाया गया प्रत्येक गीत सीधे श्रोताओं के हृदय को स्पर्श करता था। सुमन कल्याणपूर के निधन से संगीत जगत का एक पवित्र देवालय मानो रिक्त हो गया है। उनका संगीत अमर है और आने वाली पीढ़ियों को निरंतर प्रेरित करता रहेगा। महाराष्ट्र की जनता तथा समस्त संगीत प्रेमियों की ओर से दिवंगत सुमन कल्याणपूर को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूं

सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत जगतातील देव्हारा रिकामा

 सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने

संगीत जगतातील देव्हारा रिकामा

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

मुंबई, दि. : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

 

राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रसिद्ध गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुखद आहे. सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात माधुर्य होते, तरल भाव होता पावित्र्य होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत  थेट हृदयाला भिडणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे, अशीच सर्वांची भावना आहे. सुमन कल्याणपूर यांचे संगीत अजरामर आहे. राज्यातील जनतेच्या; तसेच संगीत रसिकांच्या वतीने मी दिवंगत सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी. ज्या मार्गाने खाजगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा.

 

            राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1,500 ई-बसेसना बसच्या किमतीच्या 10 टक्के किंवा कमाल 20 लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5,150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

Featured post

Lakshvedhi