Sunday, 31 May 2026

नवीन नागपूर, बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादन व्यवहारावरील मुद्रांक, नोंदणी शुल्क माफ

 नवीन नागपूर, बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादन व्यवहारावरील मुद्रांक,

नोंदणी शुल्क माफ

नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक अशी खासगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदीद्वारे संपादित करण्यात या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील मौजे गोदणी आणि मौजा लाडगाव येथे नवीन नागपूर अंतर्गत इंटरनँशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची उभारणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. याचबरोबर नागपूर शहराभोवती १४८ किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता आणि त्यालगत चार वाहतूक बेट (टर्मिनल्स) विकसित करण्यात येणार आहेत.

या दोन्ही प्रकल्पासाठी खागी जमीन वाटाघाटीने खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे ६३७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. हे दोन्ही प्रकल्प महत्वाकांक्षी आणि सार्वजनिक हिताचे आहे. यातून परिसराच्या विकासाला मोठी गती लाभणार आहे. अनेक उद्योग, व्यवसायांना संधी लाभणार आहे. त्याकरिता हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत. त्यासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ केल्यास प्रकल्पाला आणखी गती मिळणार असल्याने हे शुल्क माफ करावे, अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासनाकडे केली होती.

त्यानुसार महाराष्ट्र मुद्रांक अधिनिमातील तरतुदीनुसार या भसंपादनांतर्गत खरेदी करावयाच्या जमिनीवरील व्यवहारासाठीचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी

 डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला

अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून चार एकर पंचवीस गुंठे जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वापरात असलेली जागा संस्थेला सामाजिक कार्यासाठी नाममात्र देण्याची विनंती केली होती. याबाबत औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे ठरावाद्वारे माहिती सादर केली होती. त्यावर गृह विभागाचे निर्ण आणि शासनाचे धोरण तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समितीने तसेच राज्यस्तरीय समितीने शिफारस केल्यानुसार पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावे करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

त्यानुसार आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पुढील कार्यवाही करावी लागेल. त्यानुसार पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला चार एकर २५ गुंठेवरील अतिक्रमण नियमाअनुकुल करुन ही जमीन नाममात्र दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र यापुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंहामंडळाच्या संपादित जागेवरील अतिक्रमण काढून टाकणे, किंवा नियमित करणे, स्थलांतरित करणे यासारख्या प्रकरणी महामंडळाने धोरण तयार करावे आणि त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. त्याकरिता या प्रकरणाचा पर्व उदाहरण संदर्भ म्हणून वापर करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

--00--

अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम; ३३ आरोपी अटकेत, २७ आस्थापना सील “आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करणार

 अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम;

३३ आरोपी अटकेत, २७ आस्थापना सील

आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करणार

-          अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे

 

मुंबई , दि. २९ :- राज्यातील ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री प्रकरणांमध्ये २५ एफआयआर दाखल झाले असून ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईस्क्रीम

Maha Governor attends Bhagwad Katha Mahayagya

 Maha Governor attends Bhagwad Katha Mahayagya

 

Mumbai 29  : Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Shrimad Bhagwat Katha Mahayajna Satsang organised on the occasion of Purushottam Maas at Jogeshwari, Mumbai on Fri (29 May). 

Addressing the audience, the Governor said the Shrimad Bhagwat Katha has the power to transform the youth and instill ethics and moral values in society. 

The Governor felicitated Katha Karta Mahavir Sharan Shastri and congratulated the Savarkar Foundation, for organizing the Shrimad Bhagwat Saptah. President of the Foundation Rupesh Savarkar was also present.

०००

नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग राज्यात अव्वल स्थानी आणू

  

नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग राज्यात अव्वल स्थानी आणू

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोकसहभागातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा संकल्प माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांनी केला होता. हाच संकल्प राज्य शासन पुढे घेऊन जात आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विविध विकास कार्ये होत आहेत. राज्य शासन या सर्व विकास कार्याला भरघोस मदत करेल व येत्या काळात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला राज्यात अव्वल स्थान मिळवून देऊ, असा विश्वास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यकत केला. 

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य

                                                - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

            मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे राज्यात उत्तमोत्तम कार्य होत आहे. याचाच परिपाक म्हणून रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कारामध्ये नागपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कार्य करत या पुरस्कारावर आपले नाव कोरल्याच्या भावना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केल्या.

 

        नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर उल्लेखनीय विकासात्मक कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत व संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी 'ग्रामीण विकास पुरस्कार 2026' देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ चे वितरण

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ चे वितरण

नागपूर, दि. 29 :- केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लोकसहभागातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडत आहे. राज्य शासनाने ग्राम विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणण्याचा प्रयत्न करुन ग्रामीण भागात दर्जेदार सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा लाभ घेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभागातून परिवर्तन घडविले आहे. अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसहभागातून गावांचा विकास होऊ शकतो असा विश्वास आज येथे व्यक्त केला. 


 


रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनच्या वतीने राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री रणजीत देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त वनामती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026' प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे अध्यक्षस्थानी होते तर महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख, रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.


 


            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनने माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटेल अशा ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती व संस्थांना सन्मानित करण्याचे कौतुकास्पद कार्य या पुरस्कार वितरण समारंभाच्या आयोजनाद्वारे केले आहे. 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्तीद्वारे जिल्हा परिषदांना महत्वाचे अधिकार प्राप्त झाले आणि महिलांना जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मिळाले. रणजीतबाबू देशमुख यांनी हा कायदा सर्वप्रथम विधिमंडळात मांडला. तसेच ग्राम विकास मंत्री म्हणून नागपूरसह राज्यभर उल्लेखनीय कार्य करुन आपल्या कामाचा ठसा उमटविला, असेही त्यांनी सांगितले.


 


लोकसहभाग हा ग्राम विकासाचा मूलमंत्र असून राज्यात लोकसहभागातूनच ‘जलयुक्त शिवार योजना’ यशस्वी होऊन गावे पाणीदार झाली. रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती व संस्थांनी केंद्र व राज्याच्या योजनांचा उपयोग करून आपल्या भागाचा विकास केला ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


 


 


पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशात ग्रामविकास आणि ग्राम परिवर्तनाचे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्र शासन या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याने ग्राम विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या आहे. एक हजार पेक्षा जास्त लोकवस्तींच्या गावांना तीन टप्प्यांमध्ये काँक्रिट रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यात येत आहेत. ग्रामीण भागात घनकचऱ्याचा निचरा करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्याच्या दिशेने कार्य सुरु आहे. केंद्र शासनाच्या ‘जीरामजी’ योजनेत जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी डार्क झोन तयार झाल्याचे चित्र आहे. अशा भागात ‘जीरामजी’ योजनेद्वारे पुर्नभरण व जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत असेही त्यांनी सांगितले.


शेती क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर राज्य शासनाने भर दिला आहे. महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार ॲप’ शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहे. शेती विषयक सर्व बाबींची माहिती येथे उपलब्ध असून राज्यातील 50 लाख शेतकरी या ॲपचा उपयोग करीत आहेत. येत्या काळात राज्यातील सर्व बोली भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले.

Saturday, 30 May 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे 31 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील

सांस्कृतिक कार्यक्रमाचे 31 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

मुंबई, दि. ३० : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे सामाजिक कार्य, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीशक्तीचे दर्शन घडविणारे नेतृत्व तसेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान या कार्यक्रमातून प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे.

नृत्य, संगीत, अभिनय आणि दृश्यरचनांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या या भव्य प्रस्तुतीतून प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनसंघर्षाचा, प्रशासन कौशल्याचा आणि जनकल्याणकारी कार्याचा अनुभव घेता येणार आहे. ऐतिहासिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध कलावंत शशीन मेस्त्री (नृत्येश्वर) यांनी केले असून, नेपथ्य,  वेशभूषा,  प्रकाशयोजना आणि कलासादरीकरणाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनाचा वैभवशाली प्रवास रंगमंचावर साकारण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi