Monday, 25 May 2026

समृद्धी महामार्गाशी सुरजागडची जोडणी

 

समृद्धी महामार्गाशी सुरजागडची जोडणी

सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी ८५ किलोमीटरच्या ग्रीनफिल्ड रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार असून मुंबई ते गडचिरोली प्रवास ९ ते १० तासांमध्ये पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्यासही मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

गडचिरोलीत हजारो कोटींची गुंतवणूक

 

गडचिरोलीत हजारो कोटींची गुंतवणूक

कोनसरी येथे लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत २० हजार कोटी रुपयांच्या इंटिग्रेटेड स्टील प्लांटसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय सुरजागड इस्पातच्या माध्यमातून आणखी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून सुमारे ८ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे

नक्षलवादावर नियंत्रण

 नक्षलवादावर नियंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यात उद्योग, रस्ते, इंटरनेट सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र

 टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र

टाटा समूहासोबत चर्चा करून स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकासाची संकल्पना पुढे आणण्यात आली. त्यातून १७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्रसुरू करण्यात आले. गडचिरोलीत अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हे केंद्र दरवर्षी सुमारे ४,८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजक निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पायाभूत सुविधांसह रोजगारनिर्मितीवर भर

 पायाभूत सुविधांसह रोजगारनिर्मितीवर भर

गडचिरोलीत रस्ते, पूल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट आणि प्रशासनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ सुविधा नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणे ही सरकारची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीचा पालकमंत्री असताना नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिक

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गडचिरोलीचा पालकमंत्री असताना नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिक, आदिवासी समाज आणि पोलिसांशी संवाद साधत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रक्षाबंधन आणि दिवाळीसारखे सणही जवानांसोबत गडचिरोलीत साजरे केल्याचे सांगत त्यांनी, दुर्गम भागाचा विकास करायचा असेल, तर तेथील समाजाशी भावनिक नाते जोडणे आवश्यक असते असे सांगितले.

मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि गडचिरोलीसारखे दुर्गम भाग हे नैसर्गिक

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि गडचिरोलीसारखे दुर्गम भाग हे नैसर्गिक व औद्योगिक संपत्तीने समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील विकास केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता तो ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांपर्यंत पोहोचवण्यावर शासनाचा भर असल्याचे स्पष्ट केले. समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, स्टील प्रकल्प आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली असून कोस्ट टू फॉरेस्ट असा विकासाचा प्रवास गेल्या काही वर्षांत घडवून आणला आहे.

Featured post

Lakshvedhi