Sunday, 24 May 2026

"पशुसंवर्धनाला 'कृषी क्षेत्राचा दर्जा' मिळाल्यामुळे आता आमचे पशुपालक व शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम

 "पशुसंवर्धनाला 'कृषी क्षेत्राचा दर्जा' मिळाल्यामुळे आता आमचे पशुपालक व शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होतील. केवळ योजना कागदावर न राहता, त्या शेवटच्या घटकांपर्यंत गतीने पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश मी दिले आहेत. हा विभाग केवळ एक शासकीय विभाग न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक घराचा आर्थिक आधारस्तंभ बनेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

००००

रिक्त पदांची तातडीने भरती होणार

 रिक्त पदांची तातडीने भरती होणार

पशुसंवर्धन विभागाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व पशुपालकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व ग्रामीण स्तरावर पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची असेल तर पशुपालन क्षेत्राचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. 'कृषी दर्जा' मिळाल्यामुळे या क्षेत्राला नवे बळ मिळाले असून, सर्व योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व वेगवान पद्धतीने करण्याचे निर्देश मंत्री पंकजा  मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पशुपालकांना व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राप्रमाणेच विविध सवलती, कर्ज आणि योजनांचा लाभ मिळणे सुलभ

 पशुसंवर्धन क्षेत्राला नुकताच 'कृषी क्षेत्राचा दर्जा' बहाल करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर पशुपालकांना व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राप्रमाणेच विविध सवलती, कर्ज आणि योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे. या निर्णयाची तळागाळातील पशुपालकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडचणी कशा दूर करता येतील, याचा सखोल आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने व जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर देण्यात यावे. शासनाच्या नवीन योजनांची अंमलबजावणी थेट लाभार्थ्यांपर्यंत विनाविलंब पोहोचवण्यासाठी यंत्रणेने अधिक तत्परतेने काम करावे, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी घेतला विभागाचा सखोल आढावा रिक्त पदांची भरती व नवीन योजना गतीने राबवा

 ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी घेतला विभागाचा सखोल आढावा

रिक्त पदांची भरती व नवीन योजना गतीने राबवा

- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. २२ : पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या पशुसंवर्धन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी व पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशुसंवर्धन विभागाची सविस्तर आढावा बैठक पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी पशुसंवर्धन सचिव रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पशुसंवर्धनाला 'कृषी दर्जा' मिळाल्यानंतरच्या पुढील कार्यवाहीसह, नवीन योजनांची अंमलबजावणी व विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना गतिमान कामाचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

 एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत

 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

 

मुंबई, दि. २३ : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

 

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. यासाठी महिला व बाल विकास विभागाने मसुदा समिती गठीत केली असल्याचे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

 

सर्व प्रकारच्या कर्करोगाचे लवकर आणि अचूक निदान करण्यासाठी जगातील काही देशात लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञान

 सर्व प्रकारच्या कर्करोगाचे लवकर आणि अचूक निदान करण्यासाठी जगातील काही देशात  लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञान वापरले जाते.  या तंत्रज्ञानाबाबतचे  दक्षिण कोरियामधील आयएमबी संस्थेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ज्ञांनी  मार्गदर्शन करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

कर्करोग निर्मूलनाच्या कार्यात सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच सर्व खासगी रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास कर्करोग  निर्मूलनाचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी व्यक्त केला.


राज्यात 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू

 राज्यात 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू असून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ही मोहीम आहे. कर्करोग उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार पॅकेजचे पुनरावलोकन करण्यात आले असून रेडिओथेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी, पीईटी स्कॅन यांसारख्या उपचारांचा अधिक व्यापक समावेश करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तसेच महाराष्ट्र कर्करोग वॉरियर्स (MCW) या उपक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टच्या मदतीने  निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाते.

Featured post

Lakshvedhi