Wednesday, 20 May 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार

 

मुंबई, दि. २० : राज्यातील  टियर-२, टियर-३ आणि वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित टेकमहा इम्पॅक्ट २०२६परिषदेत करण्यात आला.

या कराराअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग-शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी यांसाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा

 स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी  विशेष मोहीम राबवा

-         कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

 

मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करावी. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. महिन्याच्या कालावधीत याबाबत कार्यवाही पूर्ण व्हावी, असे निर्देश, कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

 

नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित

शिक्षणसंस्था, शासन आणि सीएसआर संस्थांमधील सहकार्यामुळेच

 ईवाय इंडियाचे हरीश पोरवाल यांनी उद्योग, शिक्षणसंस्था, शासन आणि सीएसआर संस्थांमधील सहकार्यामुळेच रोजगारक्षमता आणि रोजगाराच्या संधींमधील दरी कमी होऊ शकते, असे सांगितले. अभ्यासक्रम रचना, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि कौशल्याधारित प्रशिक्षणामध्ये सीएसआरची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी भाग, आकांक्षीत जिल्हे, महिला आणि वंचित घटकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

२५ वर्षांत डिजिटल साक्षरता आणि रोजगारक्षमतेसाठी संस्थेच्या

 व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी मागील २५ वर्षांत डिजिटल साक्षरता आणि रोजगारक्षमतेसाठी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. एमएस-सीआयटीसह ३०० हून अधिक कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण, आदिवासी आणि लहान शहरांमधील ५ हजारांहून अधिक केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांती या एआय आधारित चॅटबॉटची माहिती देताना त्यांनी सांगितले की, तो प्रादेशिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून डिजिटल शिक्षण आणि मार्गदर्शनासाठी मदत करतो.

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये एआय आधारित शिक्षण

 शिव नाडर फाउंडेशनचे रॉबिन सरकार यांनी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये एआय आधारित शिक्षण प्रणालीमुळे मोठा बदल घडू शकतो, असे सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये एआय समर्थित उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख महिलांना साक्षर करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

युवकांमध्ये डिजिटल कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी

 सिस्को इंडियाचे नितीन भाटिया यांनी युवकांमध्ये डिजिटल कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कंपनीच्या उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांच्या सहकार्याने सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना एआय नेटवर्किंग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री ४.० चे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, उत्पादन, लॉजिस्टिक्स, अभियांत्रिकी

 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री ४.० चे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, उत्पादन, लॉजिस्टिक्स, अभियांत्रिकी आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये एआय प्रभावी साधन ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ एआयचा वापर शिकून चालणार नाही, तर त्याच्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनासोबत एआय आधारित संशोधन आणि उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi