Friday, 8 May 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत वडाळ्यात समाधान शिबिर विद्यार्थ्यांना अधिवास, उत्पन्न, एनसीएल प्रमाणपत्रांचे वाटप

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत वडाळ्यात समाधान शिबिर

  • विद्यार्थ्यांना अधिवासउत्पन्नएनसीएल प्रमाणपत्रांचे वाटप

 

मुंबईदि. ८ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानअंतर्गत वडाळा येथील जी.टी.बी. नगरातील गुरूनानक सेकंडरी हायस्कूलच्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

 

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अधिवासउत्पन्ननॉन-क्रीमी लेयर आदी विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही विविध लाभांचे वाटप यावेळी करण्यात आले.

 

दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध व्हावीतया उद्देशाने शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले. शिबिरात डिजिटल सेवाऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी १७९ सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ कार्यालयामार्फत मतदार यादी संदर्भातील विशेष स्टॉलही उभारण्यात आला होता.

मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक

 मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावनासंयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक

– निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता

मुंबईदि. ८ : शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षाडेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करणा-या टीममध्ये संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या टेक वारी २.०’ उपक्रमांतर्गत इम्प्लिमेंटेशन ऑफ लार्ज आयटी प्रोजेक्ट्स अँड प्रोक्युअरमेंट्स या विषयावरील विशेष व्याख्यानात गुप्ता  बोलत होते.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक

 निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत राज्यातील पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी आहे.

 

मुलींचे उत्तीर्ण होण्याच टक्केवारी अधिक

दहावीच परीक्षा दिलेल्या एकूण 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले (89.56 टक्के) तर एकूण 7,22,045 मुलींपैकी 6,85,672 मुली (94.96 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक आहे.

 

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्केमुंबई- 94.97, पुणे- 94.24, नाशिक- 90.53, अमरावती- 90.50, नागपूर- 89.07 तर लातूर विभागाचा निकाल 88.42 टक्के लागला आहे.

 


 

श्रेणीनिहाय निकाल

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 27.41 टक्केप्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 31.26 टक्केद्वितीय श्रेणीमध्ये 24.66 टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 8.75 टक्के इतके आहे.

 

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027 च्या दहावीच्या  परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून

दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 

         राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

         मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक

         कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के

 

मुंबईदि. : दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाहीत्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेतशासन आपल्या पाठिशी आहेअसा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.

 

मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहेअशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही पहिली पायरी आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने तिचा लाभ घ्याअसेही त्यांनी म्हटले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात तज्ज्ञांचे मत

 आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान

  • टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात तज्ज्ञांचे मत

 

मुंबईदि. ८ : कृत्रिम बुद्धिमत्ताडिजिटल प्रणाली आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शासकीय सेवा अधिक वेगवानपारदर्शक आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजीत टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

 

मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित या प्रशिक्षण सत्रात डेटा व्यवस्थापनमाहिती केंद्रेजीपीयू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालींच्या वापराबाबत प्रायमस पार्टनर्सचे अभिजित धरराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)महाराष्ट्राच्या राज्य सूचना अधिकारी सपना कपूर तसेच गुगलचे वरिष्ठ तांत्रिक विशेषज्ञ प्रवीण दवे यांनी मार्गदर्शन केले.

 

Thursday, 7 May 2026

जयगड बंदरांच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या

 जयगड बंदरांच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या

-मंत्री नितेश राणे

·         कोकणातील हापूसकाजूमत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. ६ : कोकणातील काजूहापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यातअशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतारअन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालक प्रीती चौधरीजेएसडब्ल्यू पोर्टचे दिलीप शेट्टीमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह बंदरेपरिवहन, महाराष्ट्र सागरी मंडळासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणालेकोकणातील शेतकऱ्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे असून या बंदरातून निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखत कामे गतीने व दर्जेदार करावीत. कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधाशीतसाखळी व्यवस्थातपासणी प्रक्रियावाहतूक साखळी तसेच बंदरांमधील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

 एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ६ :- मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावीअसे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 


 

मंत्री नितेश राणे म्हणालेमुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नयेतिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावीयासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेतजेणेकरून सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने राबविता येईलअसेही ते म्हणाले.

 

जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावीअशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

 

जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली

Featured post

Lakshvedhi