Thursday, 7 May 2026

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

 एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ६ :- मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावीअसे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 


 

मंत्री नितेश राणे म्हणालेमुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नयेतिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावीयासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेतजेणेकरून सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने राबविता येईलअसेही ते म्हणाले.

 

जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावीअशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

 

जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली

राग, तणाव किंवा नकारात्मक परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा विराम घेऊन विचारपूर्वक

 रागतणाव किंवा नकारात्मक परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा विराम घेऊन विचारपूर्वक प्रतिसाद द्यावाअसे मार्गदर्शन करत त्यांनी रिएक्शन’ ऐवजी रिस्पॉन्स’ देण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला. काही क्षण थांबाश्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मग निर्णय घ्या, असे त्या म्हणाल्या. तसेचइतरांच्या बोलण्यामुळे किंवा वर्तनामुळे स्वतःला दुःखी न होऊ देणे, ‘लेट गोची वृत्ती अंगीकारणे आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग हा केवळ व्यायाम नसून तो मनोविज्ञानाशी संबंधित विषय आहेजो योग्य विचारसरणी विकसित करण्यास मदत करतो. तणावमुक्तसंतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचा अवलंब करावाअसेही संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजे

 योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजेअसे सांगत संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी काम करतानाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. काम महत्त्वाचे आहेपण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवूनच काम कराअसा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

 

मानसिक तणाव आणि नकारात्मक विचार यांचा शरीरावर मोठा परिणाम होतोअसे सांगताना त्यांनी नमूद केले कीसुमारे ७० टक्के आजारांचे मूळ कारण चुकीची जीवनशैली आणि मानसिक असंतुलन आहे. त्यामुळे आत्मजाणीव आणि आत्मस्नेह या योगातील मूलभूत तत्त्वांचे पालन आवश्यक असल्याचे संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व

 तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व

- योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र

·         योगरंग’ सत्रात हंसाजी योगेंद्र यांचा आरोग्यदायी जीवनशैलीवर भर

 

मुंबईदि. ६ : आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्रही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे कायाकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ माहिती ऐकणे पुरेसे नसून ती आत्मसात करण्यासाठी मनाची एकाग्रता आणि स्थिरता आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्व असल्याचे योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

 

मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत योगरंग – योगा फॉर अ हेल्दी लाइफ’ या सत्रात योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र बोलत होत्या.

 

योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजेअसे सांगत संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी काम करतानाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. काम महत्त्वाचे आहेपण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवूनच काम कराअसा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित


- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई, दि. ६ : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.

मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असून, १ मे, १९६६ पासून वर्जित प्रयोजनांव्यतिरिक्त सर्वच शासकीय कामकाज मराठीतच करण्यात येत आहे. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा वापर फारसा होत नसल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा सुरू ठेवणे संयुक्तिक ठरत नाही, असे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात शासन स्तरावर चर्चा सुरू असून भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठी भाषा विभागाकडे करण्यात आली होती. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, अंतिम धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे


अंतिम निर्णय होईपर्यंत भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे भाषा संचालक अरूण गिते यांनी कळविले आहे.

राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय

 राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या एकूण 2148 विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी

  

'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीउपक्रमाला शासनाची मान्यता

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 6 : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी 3.30 कोटी रुपये खर्च करणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनतर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीहा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असूनत्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळून भविष्यातील संशोधक घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

Featured post

Lakshvedhi