Friday, 17 April 2026

अंधेरी सब-वेतील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा लवकरच

  

अंधेरी सब-वेतील पाणी साचण्याच्या समस्येवर

कायमस्वरूपी तोडगा लवकरच

-         नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 16 : अंधेरी सब-वे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी असेही त्या म्हणाल्या.

 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंधेरी सब-वेदाऊद बाग आणि आझादनगर परिसरातील पूरस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अमित साटममूरजी पटेलअतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या कीमोगरा नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाल्याचा प्रवाह वळवणेपाणी साठवण टाकी उभारणे तसेच नाल्याची क्षमता वाढवणे यांसारखे महत्त्वाचे पर्यायांचा विचार करावा. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबई कडून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जात असूनत्यानंतर अंतिम निर्णय

घेण्यात येणार आहे.

 

या उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाकडून यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0000

सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी

 

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.


आर्थिक वर्षातील मदत


१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८६९ रुग्णांना सुमारे ०८ कोटी १० लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


००००


 

२० गंभीर आजारासाठी मदत

 २० गंभीर आजारासाठी मदत

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६)हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरोहाताचेगुडघ्याचे प्रत्यारोपणहिप रिप्लेसमेंटकर्करोग शस्त्रक्रियारस्ते अपघातलहान बालकांची शस्रक्रियामेंदूचे आजारहृदयरोगडायालिसिसकर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन)अस्थिबंधननवजात शिशुंचे आजारबर्न (भाजलेले) रुग्णविद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

 मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

 

मुंबईदि.१७ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधारठरत आहे.  मुंबई उपनगर  जिल्ह्यात आर्थिक वर्षात ८६९  रुग्णांना सुमारे ८  कोटी १०  लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापनापेपरलेस अर्ज प्रक्रियातातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करारक्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालयधर्मादाय रूग्णालयसंस्थादाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.

            मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामीअधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये प्राप्त होणारे अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढण्याचे निर्देश

 लोढा यांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्राप्त होणारे अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढण्याचे निर्देश दिले. शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा दिली असून कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेतअसेही त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरात विद्यार्थीमहिलादिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी अर्ज भरून घेण्यात आले व त्याची तत्काळ पूर्तता करून दाखले वितरित करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. याशिवाय नवीन आधार नोंदणी व आधार अद्ययावत करण्यासाठी विशेष स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली होती

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्दिष्ट -

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्दिष्ट - मंत्री मंगल प्रभात लोढा महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्घाटन संपन्न मुंबई, दि. १७ : नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच या समाधान शिबिराकडे ‘जनता दरबार’ म्हणून पाहत प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांमध्ये ‘सर्विस प्रोव्हायडर’ नोंदणी

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांमध्ये ‘सर्विस प्रोव्हायडर’ नोंदणी व्यवस्था पुढील तीन महिन्यांत पुन्हा सुरू करावी. तसेच, वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा जिल्हा नियोजन समिती मधील किमान तीन टक्के निधीपैकी काही निधी महिला सुरक्षा यंत्रणांसाठी वापरण्याची शिफारस करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. महिला सुरक्षा विषयक यंत्रणांना आवश्यक निधीची तरतूद करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Featured post

Lakshvedhi