Friday, 17 April 2026

विधिमंडळात विद्यार्थ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि

 विधिमंडळात विद्यार्थ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि

मंत्री आदिती तटकरे यांच्याशी साधला संवाद

मुंबईदि१७ : विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळा येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला भेट दिली. या भेटीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. जशी शाळेत शिस्त पाळली जातेतसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते, असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृहसदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनः' हा विकसित भारत

 भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषाभाषानृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होतेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनःहा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्यइतिहासवारसास्वातंत्र्यलढासंस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी 'म्हारो राजस्थानहे राजस्थानचे व 'बंदे उत्कल जननीहे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.    

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकरसमितीचे सदस्यपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली.  विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य  'केसरीचा बालमाया गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई  नृत्य   लोकगीतासह सादर केले.   

भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये

 मंत्री लोढा म्हणाले की, सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये दडलेले आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. सिंगापूरमध्ये जिथे केवळ २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रकल्प उभे राहतात. तिथे १०० टक्के रोजगाराची हमी दिली जाते. आपल्यालाही महाराष्ट्रात हेच 'सिंगापूर मॉडेल' कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणायचे आहे.

यावेळी आयडिशेन कॉम्पिटिशन सहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, 'सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.     

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर

 मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर आधारितशिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक  घडविणार आहोत आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळेल.आपण एक कुटुंब आहोतविद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी होणार -

 रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी होणार

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १७ : सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

            एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलराज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनीराज्य नाविन्यता सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशीआयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली.  विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य  'केसरीचा बालमाया गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई  नृत्य   लोकगीतासह सादर केले.   

भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषाभाषानृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होतेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनःहा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्यइतिहासवारसास्वातंत्र्यलढासंस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी 'म्हारो राजस्थानहे राजस्थानचे व 'बंदे उत्कल जननीहे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.    

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकरसमितीचे सदस्यपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

००००

Featured post

Lakshvedhi