मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 17 April 2026
Thursday, 16 April 2026
एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प
एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विविध ठिकाणी जनजागृती व सेवा शिबिरे घेऊन अधिकाधिक महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी
महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे
निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी
- मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.१६ : महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख तसेच सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, विभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार आहे.
०००
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन
निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.
व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्तम दर्जाची यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. परदेशी यंत्रांमध्ये अनुभवाच्या आधारे आवश्यक बदल करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. नूतनीकरणीय ऊर्जेचा उपयोग इथे करण्यात आला आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा
या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करताना रावल यांनी ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा उल्लेख केला. या संस्थेने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांसोबत काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, जीवनकौशल्ये विकसित करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या १५ वर्षांत एका पिढीला अनिश्चिततेतून संधींकडे आणि असुरक्षिततेतून आकांक्षेकडे नेण्याचा हा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळत असून, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून, ६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम विश्वासाचा क्षण, परिवर्तनाची शक्ती आणि भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहे, असे सांगत रावल यांनी आपण केवळ अंतरासाठी नव्हे, तर बदलासाठी धावूया, असे आवाहन केले.
टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच
टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच
-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १५ - टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
हॉटेल ट्रायडेंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित ग्रॅटिट्यूड कार्यक्रमात राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी 'ही धाव अंतरासाठी नाही तर बदलासाठी आहे' या शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.
राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणाले, दोन दशकांपूर्वी प्रोकॅम इंटरनॅशनलने मांडलेली ही संकल्पना आज जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन एक प्रभावी परोपकारी व्यासपीठ म्हणून उभी राहिली आहे. या मॅरेथॉनद्वारे आतापर्यंत ७५०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला असून, यावर्षीच सुमारे ७६० कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. उद्दिष्ट आणि योग्य रचना यांचा संगम झाला, की मोठ्या प्रमाणावर परिणाम साधता येतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या
महाराष्ट्रातही महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातही सध्याच्या काळात पहिल्यादाच अतिशय जबाबदारीच्या व महत्त्वपूर्ण पदावर महिला पोहोचल्या आहेत.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, पहिल्या पोलीस महासंचालक, पहिल्या बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ही पदे महिलांनी कर्तुत्वाने मिळवली आहेत. महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या झाल्या आहेत असे त्यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुरुवातीला ‘सरपंच पती’ किंवा ‘नगरसेविका पती’ यांसारख्या प्रवृत्ती दिसून येत होत्या; मात्र कालांतराने महिला स्वतःच्या क्षमतेवर निवडून येऊन प्रभावीपणे कार्य करू लागल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...