Monday, 13 April 2026

राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान

 राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान'

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणालेजगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावेया भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संयुक्त राष्ट्रात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावेअसा ठराव मांडला होता. या ठरावाला ७१ सभासद देशांनी पाठिंबा दिल्याने संयुक्त राष्ट्राच्या वतीने जगभरात २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) २०२६ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षम्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन कृषी आणि अन्न प्रणालीतील महिलांचे अमूल्य योगदानसक्षमीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या निमित्ताने राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियानसुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाबमधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर 'पौष्टिक तृणधान्यरामबाण उपाय ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे देशभर तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य ग्राहकांमधूनही मागणी वाढत आहे. यामुळे राज्यात तृणधान्यापासून उत्पादने तयार करणारे नवउद्योजक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. या उत्पादनांची प्रसिद्धीग्राहकांमध्ये जागरुकता व बाजार साखळी तयार करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

एआय लिविंग लॅब' उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण

 एआय लिविंग लॅबउपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष

उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकेवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाहीतर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ('डेमोग्राफिक डिविडंड') हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षणआरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. AI, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'स्किल इंडियाची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे. "पूर्वी भांडवल महत्त्वाचे होतेपण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधनउपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 'एआय लिविंग लॅबसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेही अभिनंदनीय बाब आहेअसेही ते म्हणाले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीविद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने १०,००० महिलांना एआय (AI) ट्रेनिंग दिले आहे. "जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. पारंपरिक  विद्यापीठांच्या तुलनेत कौशल्य विद्यापीठांना अधिक लवचिक राहावे लागेल. आज भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत असतानाया गतीला टिकवून ठेवण्यासाठी केवळ पदवीधर नव्हेतर 'कौशल्य प्रशिक्षिततरुणांची गरज आहे. "देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा ३१% आहे.महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असतातर ती जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती. दावोस परिषदेत नुकतेच ३० लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न मध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे असेही ते म्हणाले.

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा'

 'पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचेउद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा'

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

विद्यापीठांनी नाविन्यताप्रयोगशीलता जपणे गरजेचे

राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

'एआय लिविंग लॅबउपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे प्रशिक्षण मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

 

मुंबई दि. २१ : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाहीतर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावीयाचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाचीराज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. 

एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

 एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

मुंबई दि. - 'वेलनेस आणि प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अचूक वेलनेसद्वारे अधिक लवकर आणि स्मार्ट प्रतिबंध' या विषयावर वैद्यकीय परिषद २०२६ मध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.


या सत्रात तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर केल्यास अधिक प्रभावी, अचूक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विकसित होऊ शकते. तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञान यांच्या एकत्रित वापरावर भर दिला.

महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल

 महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल उभारण्याबाबत सत्रात चर्चा झाली. हे मॉडेल केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सत्रात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे समन्वयन इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीचे संचालक डॉ. अतुल सुर्वे आणि नेशनल हेल्थ सर्विसचे वरिष्ठ सल्लागार अस्थीरोग शल्य चिकित्सक डॉ रवी बेडगे यांनी केले.


00000

आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना — महाराष्ट्रात एकात्मिक सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर

 आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना — महाराष्ट्रात एकात्मिक

 सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर


       मुंबई, दि.२८ - आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात एकात्मिक व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने “आरोग्य आणि वेलनेस मधील नवकल्पना — पुढील पिढीतील उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence) उभारणे” या विषयावर महत्त्वपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले.

पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी केलेल्या चर्चेत खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केवळ प्रशिक्षण नव्हे तर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट यांच्यासह दंतचिकित्सेचा (Oral Health) समन्वय अत्यावश्यक असण्याबाबत एकमत झाले. दंत आरोग्याचा खेळाडूंच्या ऊर्जा, पुनर्प्राप्ती, एकाग्रता व शरीराच्या संतुलनावर थेट परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.


तसेच, पुढील पिढीतील सेंटर ऑफ एक्सलन्स हे केवळ उपचार केंद्र नसून, क्रीडा वैद्यक, दंतचिकित्सा, पुनर्वसन व वेलनेस यांचा समावेश असलेली एकात्मिक आरोग्य व्यवस्था म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात

 सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन


विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड


नागपूर, दि.26 : सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 हजारावर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुजलाम- सुफलाम सावनेर होण्याच्या दिशेने सुरुवात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


               जगात युद्धाची परिस्थिती असताना भारत विश्वशांतीच्या दिशेने विचार करतो आणि विश्वशांतीसाठी विश्व महाआरतीचे सावनेर मध्ये झालेले आयोजन भूषणावह असल्याच्या भावना व्यक्त करून महाआरतीच्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


      श्री रामनवमीच्या पवित्र पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती विश्व विक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजनही त्यांचा हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल,आमदार डॉ. आशिष देशमुख ,माजी मंत्री रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi