महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले - भारत हा जगात तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. लोकशाही प्रक्रियेत युवा आमदारांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे. तरुण सदस्यांनी सभागृहात सातत्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचा सभागृहात नवीन आलेल्या सदस्यांना सभागृहाची बैठक सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित रहायला हवे, असा आग्रह असे. इतकेच नव्हे, तर ते स्वतः संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहात असत. राज्यातील सर्व प्रश्नांची माहिती होते आणि त्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे, नव्या पिढीचे, युवकांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, अशी त्यामागे त्यांची भूमिका असे. विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्याकरिता नव्या पिढीतील आमदारांच्या भूमिकेचा विचार करताना एका अनुभवसंपन्न नेत्याच्या या विचारांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न नव्या सदस्यांनी करायला हवा. शिक्षण आणि कौशल्य विकास हा विकसित भारताचा पाया असल्याचे नमूद करत, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युवा लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 10 April 2026
वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून
या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून व्दिपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. हा भव्य प्रकल्प २०१० मध्ये मंजूर करण्यात आला पण विविध अडचणींमुळे लांबला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महसूल विभाग, पोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आल्याचे महापारेषणने म्हटले आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
सुमारे २२८ कि.मी. लांबीची वीजवाहिनी
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण
• मुंबई, ठाणे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर
• प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार
• व्दिपथ वाहिनीव्दारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमता
• मुंबई, ठाणे, पालघर व अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा
• एकूण ७१५ मनोरे उभारणी नाशिक विभागात ४८५ मनोरे, वाशी विभागात २३० मनोरे उभारणी
• GMRT परिसरातून मार्गामुळे विशेष परवानग्या, वनपरवानग्या, मोबदले यांसारख्या अडचणींवर मात
• जंगल भागात मानवी श्रम व हॉटलाइन स्ट्रिंगिंगचा वापर
• पडघे–बाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणार
• कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध
• स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे सहकार्य
• महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश
मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम
मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम
महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या व्दिपथ वाहिनीवरून सुमारे ३००० अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती महापारेषण कडून देण्यात आली आहे.
मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा
मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा
मुंबई दि.९ : मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गती, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता उपाययोजना तसेच नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, अधिक्षक अभियंता श्री.बडे, यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
मुंबई, दि. 9 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
“महान खिलाड़ियों को उचित सम्मान” – मंत्री आशिष शेलार
“महान खिलाड़ियों को उचित सम्मान” – मंत्री आशिष शेलार
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार ने इस अवसर को मुंबई क्रिकेट की गौरवशाली परंपरा का स्वर्णिम क्षण बताया।
उन्होंने कहा कि मुंबई ने विश्वस्तरीय खिलाड़ी दिए हैं और यह पहल उनके योगदान को सम्मानित करने का उचित माध्यम है। उन्होंने डायना एडुलजी के योगदान को उल्लेखनीय बताया और दिलीप सरदेसाई को “जनरेशन टुगेदर” क्रिकेट लीजेंड कहा।
एकनाथ सोलकर के चपल क्षेत्ररक्षण और प्रेरणादायक जीवन की सराहना करते हुए उन्होंने रवि शास्त्री को “चैंपियन ऑफ चैंपियंस” बताया और उनके नाम पर स्टैंड का नामकरण उचित ठहराया।
उन्होंने कहा कि वानखेड़े स्टेडियम पर मुंबई के खिलाड़ियों ने कई कीर्तिमान स्थापित किए हैं और सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर और रवी शास्त्री की उपलब्धियां आज भी प्रेरणादायक हैं।
क्रिकेट अधोसंरचना पर जोर
क्रिकेट अधोसंरचना पर जोर
मुख्यमंत्री ने कहा कि मुंबई के छोटे मैदानों के संरक्षण और पुराने लीज संबंधी मुद्दों के समाधान के लिए राज्य सरकार प्रतिबद्ध है। उन्होंने आश्वासन दिया कि 20 वर्षों से लंबित समस्याओं का भी समाधान किया जाएगा।
उन्होंने यह भी बताया कि मुंबई में 60,000 से 80,000 दर्शकों की क्षमता वाला एक अत्याधुनिक स्टेडियम बनाने के लिए राज्य सरकार हरसंभव सहयोग करेगी, जिसमें बेहतर कनेक्टिविटी और हर सीट से उत्कृष्ट दृश्य व्यवस्था होगी।
हालांकि, उन्होंने यह भी स्पष्ट किया कि चाहे कितने ही नए स्टेडियम बनें, वानखेड़े स्टेडियम का महत्व हमेशा बना रहेगा।
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...