Friday, 3 April 2026

राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणून जीएसटी महसुलातील ही वाढ

 राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणून जीएसटी महसुलातील ही वाढ देशातील उच्च वाढ दरांपैकी एक असूनती राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. जीएसटीव्हॅट आणि व्यवसाय कर मिळून महाराष्ट्राच्या राज्याच्या स्वमालकीच्या कर महसुलात (SOTR) सुमारे ६४ टक्के योगदान देतातयावरून राज्य जीएसटी विभागाची वित्तीय बळकटीत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.

 

विभागाने सलग चौथ्या वर्षी आपला अर्थसंकल्पीय अंदाज (BE) ओलांडत १००.२ टक्के लक्ष्य साध्य केले आहे. जीएसटी दर संयुक्तिकरणामुळे निर्माण झालेल्या काही अडचणींनंतरही विभागाने सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सुधारित अनुपालनाच्या जोरावर या आव्हानांवर मात करत १४.६ टक्क्यांची भक्कम वाढ नोंदवली आहे.

 

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई ; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड

 शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई ;

१.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड


मुंबई: दि.३, शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.  २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप  चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व  गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.

याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबांची गरज भागू शकली असती. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर,एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू आहे.

000000

वंदना थोरात/वि.सं.अ.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती को उनके विचारों के उत्सव के रूप में मनाएं

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती को उनके विचारों के उत्सव के रूप में मनाएं

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती की तैयारियों के संबंध में

समीक्षा बैठक संपन्न

 

मुंबई, 03 अप्रैल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए विचारों और संविधान ने देश को प्रगति की दिशा प्रदान की है। उनके कार्य और समाज के उत्थान के लिए किए गए योगदान को समाज के प्रत्येक वर्ग तक पहुंचाना अत्यंत आवश्यक है। राज्य सरकार हर वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती को अधिक प्रभावी और भव्य रूप से मनाने का प्रयास करती हैऔर इस वर्ष भी विभिन्न विभागों के समन्वय से इसे और अधिक व्यापक रूप में मनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपील की कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती को उनके विचारों के उत्सव के रूप में मनाया जाए। 14 अप्रैल 2026 को आयोजित होने वाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती की तैयारियों के संदर्भ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में सह्याद्री अतिथि गृह में समीक्षा बैठक आयोजित की गई।

भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती

 मंत्री संजय शिरसाट म्हणाले,भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असूनजिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे.

चित्यभूमीउन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेचदादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असूनत्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधीहक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहेहे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया

                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या

पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

 

   मुंबईदि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असूनयावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Featured post

Lakshvedhi