मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत 11 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. यात रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले. तसेच मँचेस्टर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रीडा औषधनिर्माण क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 30 March 2026
उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये 'बल्क ड्रग्ज पार्क'साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स
उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये 'बल्क ड्रग्ज पार्क'साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.
उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये
उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये 'बल्क ड्रग्ज पार्क'साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.
पुढील दशकात महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, दोन दिवस चाललेल्या या परिषदेत एकूण 15 सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. त्यापैकी 3 करारांद्वारे सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली, तर 12 करार धोरणात्मक भागीदारीचे होते. परिषदेत 10 हून अधिक देशांतील 130 पेक्षा जास्त तज्ञ आणि 3000 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ही केवळ परिषद आयोजित केली नाही, तर पुढील दशकात महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत 15 सामंजस्य करार, 720 कोटींची गुंतवणूक –
पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा;
परिषदेत 15 सामंजस्य करार, 720 कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.28: ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री.फडणवीस यांनी माहिती दिली.
सेल्फ केअरचा अर्थ केवळ स्वतःला दूर ठेवणे नसून, स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन
सेल्फ केअरचा अर्थ केवळ स्वतःला दूर ठेवणे नसून, स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे असा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. व्यक्तीने स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे, तसेच संतुलित जीवनशैली राखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सत्रात मानसिक आरोग्य सेवेत सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा, आर्थिक स्थिती, ग्रामीण-शहरी पार्श्वभूमी यांसारख्या घटकांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. ‘इंटरसेक्शनॅलिटी’ या संकल्पनेवर भाष्य करताना प्रत्येक व्यक्ती विविध ओळखी (identity) घेऊन येत असल्याने उपचार करताना त्या सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला केवळ ‘केस’ म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून समजून घेणे आणि त्याच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार उपचार योजना आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीतील बदलांवरही भर देण्यात आला. यामध्ये मोबाईलचा मर्यादित वापर, निसर्गाशी संपर्क, पुरेशी झोप, कुटुंबीय व मित्रांशी संवाद, तसेच संगीत, वाचन यांसारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच, मानसिक आरोग्य क्षेत्र अधिक प्रभावी व सर्वसमावेशक करण्यासाठी संदर्भाधारित शिक्षण, मानवकेंद्रित दृष्टिकोन, प्रभावी संवाद, तसेच प्रणाली-स्तरावर (system-level) समर्थन आवश्यक असल्याचे या सत्रातून स्पष्ट झाले.
NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक
NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.
सत्रात मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी (self-care) हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. तज्ज्ञांनी नमूद केले की, मानसिक आरोग्य तज्ज्ञ देखिल माणूस असल्यामुळे रुग्णांच्या समस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे सेल्फ केअर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कार्यस्थळ, कुटुंब आणि समाज यांनीही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
जयहिंद मित्रांनो जयहिंद शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा 2019 5 मे 2019 रविवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव ब...